जीएसटी चुकवेगिरीप्रकरणी पालेकर बेकरीची चौकशी
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: August 20, 2024 11:54 PM2024-08-20T23:54:22+5:302024-08-20T23:54:41+5:30
यासंदर्भात संपर्क साधला असता कायद्यानुसार वसुलीची कार्यवाही सुरू असल्याचे जीएसटीचे सहआयुक्त संजय पोखरकर यांनी लोकमतला सांगितले.
अमरावती : स्थानिक पालेकर बेकरी प्रायव्हेट लिमिटेड आणि संलग्न रवींद्र फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडवर मंगळवारी जीएसटी पथकाने संशयित जीएसटी चुकवेगिरीप्रकरणी छापा टाकला. या प्रतिष्ठानांशी संबंधित दोन कारखाने व तीन दुकानांची चौकशी सुरू आहे.
करमुक्त बेकरी उत्पादनांतर्गत जीएसटी देय उत्पादनांचे चुकीचे वर्गीकरण करून संशयास्पद करचोरी, विक्री केलेल्या करमुक्त वस्तूंवर इनपुट टॅक्स क्रेडिटचे चुकीचे दावे आदी मुद्द्यांचा समावेश चौकशीत आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये जीएसटी प्राधिकरणाने जारी केलेल्या निर्णय आदेशांमध्ये एक कोटींहून अधिकची अतिरिक्त जीएसटी मागणी आधीच वाढलेली आहे. यासंदर्भात संपर्क साधला असता कायद्यानुसार वसुलीची कार्यवाही सुरू असल्याचे जीएसटीचे सहआयुक्त संजय पोखरकर यांनी लोकमतला सांगितले.