बच्चू कडू यांच्या दोन्ही संस्थांची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:45 PM2018-07-02T23:45:33+5:302018-07-02T23:47:11+5:30

आमदार बच्चू कडू यांच्या दोन संस्थांतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. सहायक निबंधकांच्या कक्षात चर्चेदरम्यान जिल्हा उपनिबंधकांकडून चौकशीचे लेखी आश्वासन प्राप्त झाल्यानंतर तिरमारे यांनी आत्मदहन मागे घेत असल्याचे सोमवारी जाहीर केले.

The investigation will be done by both the organizations of Bacchu Kadu | बच्चू कडू यांच्या दोन्ही संस्थांची चौकशी होणार

बच्चू कडू यांच्या दोन्ही संस्थांची चौकशी होणार

Next
ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधकांचे लेखी आश्वासन : तिरमारे यांचे आत्मदहन स्थगितसंस्था गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : आमदार बच्चू कडू यांच्या दोन संस्थांतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. सहायक निबंधकांच्या कक्षात चर्चेदरम्यान जिल्हा उपनिबंधकांकडून चौकशीचे लेखी आश्वासन प्राप्त झाल्यानंतर तिरमारे यांनी आत्मदहन मागे घेत असल्याचे सोमवारी जाहीर केले.
आ. कडू यांनी स्थापन केलेल्या प्रहार कृषी संस्था मर्यादित (बेलोरा) व पूर्णा नागरी पतसंस्थेत गैरव्यवहाराची तक्रार तिरमारे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली. गैरव्यवहाराचे पुरावे दिल्यानंतरही कारवाई न झाल्याने आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार ते दुपारी दीड वाजता सहायक निबंधक कार्यालयात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त होता. यावेळी तिरमारे यांच्याशी सहायक निबंधक राजेंद्र भुयार यांनी चर्चा केली व जिल्हा उपनिबंधकांना माहिती दिली. यानंतर जिल्हा उपनिबंधकांकडून लेखी आश्वासन प्राप्त झाले.
जिल्हा उपनिबंधकांच्या आश्वासनामध्ये हे आहेत मुद्दे
प्रहार कृषिप्रक्रिया सहकारी संस्थेला २८ लाख १४ हजारांचे शासकीय कर्ज, १९ लाख २३ हजार व्याज, थकीत भागभांडवल ३ लाख २९ हजार आणि शासकीय भागभांडवल ३ लाख ३० हजार अशी एकूण ५० लाख ६६ हजार रुपये १५ दिवसांच्या आत भरण्याची नोटीस संस्थेला देण्यात आली आहे. पूर्णा नागरी पतसंस्थेचीसुद्धा चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

तक्रारीनुसार दोन्ही संस्थांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
- राजेंद्र भुयार,
सहायक निबंधक

आ. कडू यांच्या दोन्ही संस्थांची चौकशी व कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे.
- गोपाल तिरमारे, नगरसेवक

Web Title: The investigation will be done by both the organizations of Bacchu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.