समृद्ध जीवनमधील गुंतवणूकदार चिंतातुर

By admin | Published: December 31, 2015 12:08 AM2015-12-31T00:08:28+5:302015-12-31T00:08:28+5:30

समृद्ध जीवन फाऊंडेशन सर्वेसर्वा महेश मोनेवार याला अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुंतवणूकदार आणि एजंटस् चिंतातुर झाले आहेत.

Investors anxious in rich life | समृद्ध जीवनमधील गुंतवणूकदार चिंतातुर

समृद्ध जीवनमधील गुंतवणूकदार चिंतातुर

Next

ग्राहक, एजंटची कार्यालयात धाव : व्यवहार सुरळीत असण्याचा दावा
अमरावती : समृद्ध जीवन फाऊंडेशन सर्वेसर्वा महेश मोनेवार याला अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुंतवणूकदार आणि एजंटस् चिंतातुर झाले आहेत. सेबीने मनाई केल्यानंतरही गुंतवणूकदारांकडून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा केल्याप्रकरणी समृद्ध जीवन फाऊंडेशनचे सर्वेसर्वा महेश मोनेवार याला अटक झाल्यानंतर त्यांच्या --- ४४ कार्याल्यांवरही केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने धाडी घातल्या. त्यापार्श्वभूमिवर स्थानिक कार्यलयांशी जुळलेल्या ग्राहक गुंतवणुकदारांची चुळबुळ वाढली आहे.
कोणत्याही प्रकारची गुंतवणुक घेण्यास सेबीने समृद्ध जीवन ला निर्बंध घातले होते. परंतू तरी देखील गुंतवणूक सुरुच ठेवल्याने सेबीने महेश मोनोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सीबीआय मार्फत सुरु आहे. चिटफंडच्या नावाखाली गुंणवणुकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा आरोप समृद्ध जीवनवर केला जात आहे. त्यामुळे समृद्ध जीवन मधील विविध योजनांमध्ये गुंतवणुक केलेली रक्कम मिळेल की बुडेल ? असा प्रश्न गुंतवणुकदारांना पडला आहे. ज्या एजंटच्या माध्यमातून ग्राहकांनी यात गुंतवणुक केली. त्या एजंटच्या माध्यमातून ग्राहकांनी यात गुंतवणुक केली. त्या एवंटवर तर ग्राहकांकडून प्रश्नांची अरबत्ती केली जात आहे. दरम्यान अमरावतीमधील कोर्यालयातून व्यवहार सुरळीत सुरु असल्याचे दिसून आले. तथापी गावगाड्यातून आलेल्या ग्राहक व एजंटांनी रक्कमेच्या विश्वासाबाबत शंका व्यक्त केली आहे. सन २०१५ पासून अमरावतीमध्ये समृद्ध जीवन चे शाखा कार्यालय असून या कार्यालयातून जिल्ह्यातील सुमारे १० हजार लोकांकडून विविध योजनेमधून गुंतवणूक करुन घेण्यात आली. गेल्या २ वर्षापासून समृद्ध जीवन मल्टीसेट मल्टीपर्पज को. आॅपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून विविध योजना आणि ग्राहकांकडून गुंतवणूक करवून घेतल्या गेल्याची माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील ग्राहकांची समृद्ध जीवन मध्ये सुमारे २ हजार कोटींची गुंतवणुक असल्याचे बोलले जाते. जयस्तंभ चौकालगतच्या गुल्हाने प्लाझामधील तिसऱ्या माळ्यावर समृद्ध जीवन चे कार्यालय आहे.

तर माझी सासू घराबाहेर काढेल

समृद्ध जीवनचा सर्वेसर्वा महेश मोतेवार याला अटक करण्यात आल्यानंतर सीबीआयने मंगळवारी तब्बल ५८ ठिकाणी छापे टाकले. त्यात अमरावतीचाही समावेश असल्याची चर्चा होती. मात्र अमरावतीमध्ये अशी धाड घालण्यात आली नाही. तथापि समृद्ध जीवन बाबत माध्यमांमध्ये विविध वृत्त छापून आल्याच्या पर्श्वभूमीवर जिल्हा अमरावती ग्राहक व एजंटसने आज गुलशन प्लाझामधील कार्यालयात येवून आपली गुंतवणूक सुरक्षित आहे की नाही, याबाबत खातरजमा करण्यासाठी आलेल्यांना सुरक्षिततेची हमी देण्यात आली. समृद्ध जीवनमधील रक्कम बुडाल्यास सासू मला घराबाहेर काढेल अशी एका गुंतवणूकदार महिलेची बोलकी प्रतिक्रिया अन्य सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकेर उमटवून गेली.

Web Title: Investors anxious in rich life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.