लोणी-मोरगाव रस्त्याने अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:12 AM2021-03-06T04:12:23+5:302021-03-06T04:12:23+5:30
खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त : बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील लोणी-मोरगाव रस्त्याची अतिशय दैनावस्था झाली आहे. दररोज ...
खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त : बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील लोणी-मोरगाव रस्त्याची अतिशय दैनावस्था झाली आहे. दररोज या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मनस्ताप सहन करावा लागत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही कुंभकर्णी झोपेतच असल्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
अकोला रोडवर असलेल्या लोणीजवळून पूर्वेकडे मोरगाव आहे. लोणीपासून मोरगाव अवघे दोन किमी अंतरावर आहे. परंतु, हे दोन किमी अंतर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुपटीवर गेले आहे. रस्त्यावरील खड्डे पाहता, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी स्थिती झाली आहे. दोन किलोमीटरच्या या संपूर्ण रस्त्याची चाळणी झाली असून, दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. परंतु, बांधकाम विभागाला त्यांच्याशी देणे-घेणेच नसल्याचे बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवरून दिसून येते. शेतकऱ्यांना आपला शेतमाल शेतातून बाजारापर्यंत घेऊन जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे व रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून गावकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन केले आहे.