मृताच्या नावे चालान !

By Admin | Published: September 7, 2015 12:33 AM2015-09-07T00:33:13+5:302015-09-07T00:33:13+5:30

येथील शहर वाहतूक पोलिसांची दबंगगिरी जोरात सुरूआहे. रिकाम्या उभ्या असलेल्या प्रवासी वाहनांत अस्तित्वात नसलेले ...

Invoice Into Names! | मृताच्या नावे चालान !

मृताच्या नावे चालान !

googlenewsNext

वाहतूक पोलिसाचा प्रताप : जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

लोकमत विशेष
राजेश मालवीय  धारणी
येथील शहर वाहतूक पोलिसांची दबंगगिरी जोरात सुरूआहे. रिकाम्या उभ्या असलेल्या प्रवासी वाहनांत अस्तित्वात नसलेले बोगस व मृत व्यक्ती प्रवास करीत असल्याच्या खोट्या नोंदी वाहतूक बुकात करून चालान देण्याचा प्रकार झाल्याचे उघडकीस आले. वाहन मालकाला अवैधरीत्या आर्थिक रकमेची मागणी करणाऱ्या वाहतूक पोलिसाविरुध्द वसंत आठवले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनात पूर्ण जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई जोरात सुरू आहे. धारणी शहरात दररोज २० पेक्षा अधिक वाहनांवर करण्यात आली आहे. मात्र येथील वाहतूक पोलीस या कारवाईचा दुरुपयोग करीत आहेत. धारणी, उतावली, चाकर्दा मार्गावर वसंत आठवले यांची मॅजीक प्रवासी वाहनात प्रवासी वाहतूक सुरू आहे. २९ आॅगस्ट रोजी वाहन राममंदिरासमोर उभी होती. वाहनत प्रवासी नसतानाही वाहतूक पोलीस सचिन होले याने पोलिसी खाक्या दाखवून चक्क रिकाम्या वाहनाचे चालान फाडले. रिकाम्या गाडीत १८ प्रवासी प्रवास करीत असल्याचेही वाहतूक बुकात नोंद करुन न्यायालयात सादर केले. गाडी मालकाने न्यायालयातून 'इस्तगासा' मिळविल्यानंतर नावे बधितले असता १० नावे काल्पनिक असून ते प्रवासी संबंधित गावात राहत नसल्याचे सरपंच, पोलीस पाटलांनी दाखले दिले आहेत. वाहतूक पोलिसाने शांताबाई खंडारे (रा. उतावली) प्रवास केल्याचे रेकॉर्डवर दाखविले. मात्र, शांताबाई खंडारे यांचे चार वर्षांपूर्वीच निधन झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
अशी काही बोगस काल्पनिक नावे टाकून पोलिसी पेशाला बदनाम करून सूड भावनेने कार्य करणाऱ्या वाहतूक पोलीस सचिन होले याने खोटे चालान व दस्तऐवजांची चौकशी करून कारवाई करण्याची तक्रार वसंत आठवले यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. संबंधितांकडून कागदपत्राची पाहणी केली. तसेच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी सांगितले.

मृत व्यक्तींची नावे चालान बुकात
धारणी-उतावली-चाकर्दा गावात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक चालान बुकातील नावे मृत शांताबाई खंडारे (रा.उतावली) आणि अस्तित्वात नसलेली नावे रमेश इंगळे (रा.कारदा), राजू धांडे (रा.चाकर्दा) हिरा धांडे, सुनील धांडे, राजू गायन, समोती मावस्कर (रा. उतावली), शिवलाल जावरकर, बंसी जांभेकर, नाना जांभेकर अशी आहेत.
 

Web Title: Invoice Into Names!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.