आयपीएस लाच प्रकरण : हजारो किलोमीटर प्रवास करूनही सापडला नाही फरार यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 04:00 PM2018-02-27T16:00:30+5:302018-02-27T16:00:30+5:30
महिनाभरापासून फरार असलेले व नांदेड जिल्हा इतवारा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच अमरावतीमध्ये परिविक्षाधीन म्हणून राहिलेले आयपीएस जी.विजयकृष्ण यादव याच्यावर लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आयपीएस यादवच्या शोधात अमरावती लाच लुचपत विभागाचे तपास पथक यादवच्या शोधार्थ सहा दिवसांत हजारो किलोमीटरचा शासकीय वाहनाने प्रवासही केला. मात्र, तो कुठेच गवसला नाही.
अमरावती : महिनाभरापासून फरार असलेले व नांदेड जिल्हा इतवारा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच अमरावतीमध्ये परिविक्षाधीन म्हणून राहिलेले आयपीएस जी.विजयकृष्ण यादव याच्यावर लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आयपीएस यादवच्या शोधात अमरावती लाच लुचपत विभागाचे तपास पथक यादवच्या शोधार्थ सहा दिवसांत हजारो किलोमीटरचा शासकीय वाहनाने प्रवासही केला. मात्र, तो कुठेच गवसला नाही.
काही दिवसांपासून लाच मागितल्याप्रकरणी फरार असलेल्या आयपीएस यादवच्या शोधात अमरावती लाच लुचपत विभागाचे एक अधिकारी, तीन कर्मचारी २१ फेब्रुवारीला त्याच्या शासकीय घराच्या पत्यावर शोध घेण्यासाठी गेले असता ते घर कुलूपबंद आढळून आले. त्याचबरोबर हैदराबाद, औरंगाबाद, नांदेड व इतर शहरांमध्ये व नातेवाईकांच्या घरी जाऊन यादवचा शोध घेतला. पण, तो कुठेच आढळून आला नाही, अखेर २६ फेब्रुवारी रोजी तपास पथक अमरावतीला परत आले आहे. त्यामुळे आता फरार आयपीएस यादवला अटक करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोणती युक्ती वापरणार याकडे लक्ष लागले आहे.
साक्षीदार करतो यादच्या जामीनसाठी मदत
एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी जामीनवर सुटलेला नांदेड येथील साथीदार फरार आयपीएस यादवला तातपुरता अटकपूर्व जामीनसाठी औरंगाबाद खंडपीठ न्यायालयात मदत करीत असल्याची नांदेड पोलीस विभागात चर्चा रंगत आहे.
फरार आरोपी आयपीएस यादवचे मोबाईल ईएमआय नंबर व इतर विषयावरूनसुद्धा तपास केला जात आहे. लवकरच शोध घेतला जाईल.
- राहुल तसरे, तपास अधिकारी, एसीबी, अमरावती