व्हीएमव्हीतून लोखंडी अँगल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:10 AM2021-06-28T04:10:43+5:302021-06-28T04:10:43+5:30

00000000000000000000000 राठीनगरातून दुचाकी लंपास अमरावती, : राठीनगर परिसरातून एका इसमाची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. ...

Iron angle lamps from VMV | व्हीएमव्हीतून लोखंडी अँगल लंपास

व्हीएमव्हीतून लोखंडी अँगल लंपास

Next

00000000000000000000000

राठीनगरातून दुचाकी लंपास

अमरावती, : राठीनगर परिसरातून एका इसमाची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. मुस्तफा ताहेर बाटावाला (४१, रा. नागपुरी गेट) यांनी राठीनगरात एमएच २७ एएम ७८६८ या क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. मेडिकलमधून ते परत आले असता, त्यांची दुचाकी दृष्टीस पडली नाही. त्यांनी या घटनेची तक्रार गाडगेनगर पोलिसांत नोंदविली.

0000000000000000000000

सावर्डीत तरुणीचा विनयभंग

अमरावती, : नांदगावपेठ-सावर्डी एमआयडीसीत एका कामगार तरुणीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना २६ जून रोजी उघडकीस आली. अंकुश गाडगे (रा. तळेगाव श्यामजीपंत, जि. वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा नेहमी प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. फोनवर त्रास देत कंपनीतून काढण्याची धमकी देत होता, असे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले. तळेगाव श्यामजीपंत ठाण्यातून ही तक्रार नांदगाव पेठ ठाण्याकडे वर्ग करण्यात आली.

--------------

तंबाखू न दिल्याने काठीने मारहाण

अमरावती : तंबाखू न दिल्यामुळे एका व्यक्तीला काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना तळेगाव ठाण्याच्या हद्दीतील धामक गावात उघडकीस आली. पाडुरंग चंपतराव गोंडाणे (रा. धामक) व मधुकर चव्हाण हे घरासमोर बसले असताना, तेथे नितीन रमेश राऊत आला. त्याने पाडुरंग गोंडाणे यांना तंबाखू मागितला. परंतु, त्यांनी नकार दिला. त्यामुळे नितीनने पाडुरंग यांच्यावर काठीने मारहाण केली. काठीवर असणाऱ्या खिळ्यामुळे पाडुरंग यांचा कान चिरला गेला. या घटनेची तक्रार तळेगाव पोलिसांत करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी नितीन राऊतविरुद्ध गुन्हा नोंदविला.

0000000000000000000000000000

रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

अमरावती, : रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी शनिवारी सोनोरी जालनापूर येथे ताब्यात घेतले. ब्राम्हणवाडा थडीचे पोलीस कर्मचारी संजय शिंदे यांच्या पथकाने गोपनीय माहितीवरून एमएच २७ एल ९६८८ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा पाठलाग केला. पोलिसांनी ट्रॅक्टर व रेती असा एकूण ४ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Iron angle lamps from VMV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.