गणेडीवाल मार्गाजवळील लोखंडी खुंट देतोय अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:13 AM2021-09-03T04:13:46+5:302021-09-03T04:13:46+5:30
(फोटो आहे.) अमरावती : विभागीय आयुक्त कार्यालयानजीक गणेडीवाल ले-आऊटकडे जाणाऱ्या रस्तालगत मुख्य रस्त्याच्या कडेला एक लोखंडी धारदार खुंट आहे. ...
(फोटो आहे.)
अमरावती : विभागीय आयुक्त कार्यालयानजीक गणेडीवाल ले-आऊटकडे जाणाऱ्या रस्तालगत मुख्य रस्त्याच्या कडेला एक लोखंडी धारदार खुंट आहे. तो अपघाताला आमंत्रण देत आहे. काही दिवसांपूर्वी कारचे चाक त्यावरून गेल्याने एका कारचालकाचा टायर फुटल्याची घटना घडली.
बियाणी चौक ते वेलकम पॉईंटकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण बांधकाम विभागाने केले. मात्र काही पोल हटविताना एका पोलचा धारदार लोखंडी खुंट गणेडीवाल ले-आऊट नजीकच्या मुख्य मार्गाच्या कडेला तसाच ठेवण्यात आला. वाहनाचे वळण घेताना रात्री तो कारचालकांना दिसत नाही. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी एका कारचालकाने त्या खुंटावरून कार नेल्याने टायर निकामी झाला. त्यांनी ही माहिती ‘लोेकमत’ला दिली.
कोट
माझ्याकडे येऊन परत जाणाऱ्या मित्राची कार रस्त्याने वळण घेताना लोखंडी खुंटावरून गेली. टायर फुटला. येथे लहान मुुलेदेखील सायकलिंग करतात. त्यांना अपघाताची शक्यता आहे. तातडीने तो धारदार खुंट काढावा.
- नितीन चांदूरकर, नागरिक, गणेडीवाल ले-आऊट, अमरावती