रमाई आवास घरकुल योजनेत गैरप्रकार; यादीत बोगस लाभार्थी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:35 IST2025-01-14T13:34:47+5:302025-01-14T13:35:34+5:30

Amravati : कंत्राटी अभियंत्यावर रोष, आयुक्तांकडे नागरिकांनी मांडले वास्तव

Irregularities in Ramai Awas Gharkul Yojana; Bogus beneficiaries in the list? | रमाई आवास घरकुल योजनेत गैरप्रकार; यादीत बोगस लाभार्थी?

Irregularities in Ramai Awas Gharkul Yojana; Bogus beneficiaries in the list?

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
अनुसूचित जाती संवर्गातील नागरिकांना हक्काचे पक्के घर निर्माण व्हावे, यासाठी रमाई आवास योजना (शहरी) अमरावती महानगरपालिका अतिशय चांगल्या प्रकारे राबवीत आहे. मात्र या योजनेत कंत्राटी अभियंत्यांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी दस्तुरखुद्द लाभार्थीनीच केल्या आहेत. बोगस लाभार्थीना घरकुल मंजूर करण्यात आले असून, गरिबांच्या घरामध्ये कंत्राटी अभियंताचा 'अर्थ'पूर्ण हस्तक्षेप वाढल्याची कैफियत १० जानेवारी रोजी अन्यायकारक नागरिकांनी आयुक्तांच्या पुढ्यात मांडली. आठ दिवसांत पात्र लाभार्थ्यांना 'रमाई'चा लाभ मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा ईशारा देण्यात आला आहे.


आयुक्त सचिन कलंत्रे यांनी या शिष्टमंडळाची कैफियत जाणून घेतली. दरम्यान, शहर अभियंता रवींद्र पवार यांच्याकडून रमाई आवास योजनेची माहिती जाणून घेतली. कंत्राटी अभियंता सुमीत कांबळे यांच्या संदर्भातील धुमाकूळ घातल्याच्या तक्रारीची शहानिशा करून त्यांना त्वरेने सेवेतून कार्यमुक्त करावे, असे निर्देश आयुक्त कलंत्रे यांनी शहर अभियंत्यांना दिली. १४ व १५ जानेवारी रोजी आलेल्या तक्रारीनंतर यातील खरा गैरप्रकार उघड होण्याची शक्यता आहे. 


यंदा २००० घरकुलांचे उद्दिष्ट 
सन २०२४-२०२५ या वर्षात मनपाला दोन हजार घरांचे उद्दिष्ट असून त्यामध्ये ११०० पात्र लाभार्थ्यांची आक्षेप यादी। प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र यावर आयुक्तांनी प्रथमच दूध का दूध, पाणी का पाणी' करण्याची भूमिका घेत दोन दिवसीय शिबिराचे आवाहन केले आहे. या माध्यमातून प्रशासन लाभाथ्यापर्यंत पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल करेल.


आयुक्ताचे आश्वासन, ठिय्या आंदोलन मागे
शुक्रवार, १० जानेवारी रोजी काही संघटना व रमाई आवास योजनेच्या लाभार्थीद्वारे ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. मंजूर लाभार्थी यादीवर आक्षेप घेत कंत्राटी अभियंता कांबळे हे मनमर्जीने आणि अर्थपूर्ण काम करतात, याबाबतची माहिती आयुक्तांसमोर सादर केली. दरम्यान आयुक्त कलंत्रे यांनी वस्तुस्थितीचा आढावा घेत तक्रारकर्त्यांची - कैफियत समजून घेतली. त्यानंतर नागरिकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.


१५ वर्षातील रमाई आवास योजनेचा लेखाजोखा 
सन                           घरकुलांची संख्या                    

२०१०                                 २९३ 
२०११-                                 ७० 
२०१२                                 ३५० 
२०१३                                १९९४ 
२०१४                                  ००
२०१५                                 ७६६ 
२०१६                                १४६१ 
२०१७                                 ११५ 
२०१८                                 ६९७ 
२०१९                                   ००
२०२०                                  ०० 
२०२१                                 ५००
२०२२                                  ००
२०२३                                 ९६४
२०२४                                  ००


"आयुक्तांच्या आढावा बैठकीत नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने रमाई घरकुल योजनेतील गैरकारभाराबाबत मंथन झाले. यात कंत्राटी अभियंत्यांवर कारवाईचे निर्देश आयुक्तांनी दिले असून लवकरच सेवेतून कार्यमुक्तीचे आदेश जारी केले जातील." 
- रवींद्र पवार, शहर अभियंता


 

Web Title: Irregularities in Ramai Awas Gharkul Yojana; Bogus beneficiaries in the list?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.