राज्यमंत्र्यांनी केले शेतकऱ्यांकरिता सिंचन विभागातील दालन खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 01:42 AM2020-01-19T01:42:32+5:302020-01-19T01:43:56+5:30
ना. बच्चू कडू यांनी यावेळी अधीक्षक अभियंता रश्मी ठाकरे यांच्याशी प्रकल्पासंदर्भात चर्चा केली तसेच उपाध्यक्षांच्या दालनातील फर्निचर बदलविण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या. उपाध्यक्षांच्या दालनाचा यानंतर ना. कडू यांच्या शासकीय कार्यालयासाठी वापर करण्यात येणार आहे. शेतकºयांच्या सिंचनासंदर्भात काही अडचणी असल्यास, त्या दालनातच जाणून घेतल्या जातील. आठवड्यातील सुटी वगळता इतर दिवशी या ठिकाणी ना. कडू यांचे खासगी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती सिंचन विभागाला शनिवारी प्रहार कार्यकर्त्यांसमेवत आकस्मिक भेट दिली. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षांचे दालन त्यांनी उघडले. त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर, हे दालन शेतकºयांच्या तक्रारी व त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता खुले राहणार असल्याचे स्पष्ट केले. याकरिता विश्वासातील काही पदाधिकाºयांना येथे थांबण्याची जबाबदारीही त्यांनी निश्चित केली. त्यामुळे शेतकºयांकरिता सिंचन विभागाचे दालन आता खुले झाले आहे.
ना. बच्चू कडू यांनी यावेळी अधीक्षक अभियंता रश्मी ठाकरे यांच्याशी प्रकल्पासंदर्भात चर्चा केली तसेच उपाध्यक्षांच्या दालनातील फर्निचर बदलविण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या. उपाध्यक्षांच्या दालनाचा यानंतर ना. कडू यांच्या शासकीय कार्यालयासाठी वापर करण्यात येणार आहे. शेतकºयांच्या सिंचनासंदर्भात काही अडचणी असल्यास, त्या दालनातच जाणून घेतल्या जातील. आठवड्यातील सुटी वगळता इतर दिवशी या ठिकाणी ना. कडू यांचे खासगी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जेव्हा राज्यमंत्री अमरावतीत असतील तेव्हा याच ठिकाणी ते अधिकाºयांचा व जिल्ह्यातील सिंचन परिस्थितीचाही आढावा घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
ना. कडू यांनी यानंतर आपला मोर्चा सिंचन विभागाच्या शासकीय विश्रामगृहाकडे वळविला. त्या ठिकाणी काही अधिकाºयांशी चर्चा केली. रेस्ट हाऊसमधील एक सूट माझ्यासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवावा. माझ्या परवानगीशिवाय तेथे कुणालाही प्रवेश करू देऊ नये, असे त्यांनी अधिकाºयांना बजावले. डायनिंग टेबल व सोफा काढून त्या ठिकाणी मोठा मीटिंग टेबल ठेवावा. मीटिंग घेण्यास तो टेबल कामी येईल व त्यावर भोजनसुद्धा करता येईल अशी व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिला. प्रकल्पानिहाय फाइल तयार करण्यात याव्या व अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची माहिती अद्ययावत करून मला द्यावी, म्हणजे फॉलोअप घेता येईल, अशा सूचनाही त्यांनी त्यांचे ओएसडी अनिल भटकर यांना दिल्या. ना. कडूंनी जलसंपदा विभागात आकस्मिक भेट देऊन पाहणी केल्याने अधिकाºयांची दमछाक झाली.