इर्विन रुग्णालयात ठिकठिकाणी पानपिचकाऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:11 AM2021-01-02T04:11:15+5:302021-01-02T04:11:15+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती स्वातंत्र्यपूर्व काळातील असून, त्यात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत खाटाची संख्या तोकडीच आहे. परंतु, वाढत्या रुग्णांच्या सुविधेसाठी ...
जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती स्वातंत्र्यपूर्व काळातील असून, त्यात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत खाटाची संख्या तोकडीच आहे. परंतु, वाढत्या रुग्णांच्या सुविधेसाठी नवीन इमारतींचे बांधकाम करण्यात आलेले आहेत. काही वार्डांत ३० खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. औषधींचा पुरवठा गरजेनुसार होत असला महागड्या औषधी येथे उपलब्ध नसल्याने खासगी मेडिकलमधून आणण्याचा सल्ला येथील कर्मचारी देतात. प्रत्येक वार्डातील दार अर्धेअधिक पानपिचकाऱ्यांनी भरलेले नित्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे येथील उपचार पद्धती नीट असली तरी अस्वच्छतेमुळे त्याला गालबोट लागत असल्याची प्रतिक्रिया एका रुग्णाच्या सुज्ञ नातेवाईकांनी दिली. नियोजनानुसार रुग्णांवर उपचार होत असला समाधानकारक सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत असल्याच्या रुग्णांच्या प्रतिक्रिया आहेत.
कोट
इर्विन रुग्णालय गरीब रुग्णांकरिता उत्तम उपलब्धी आहे. तेथील उपचार पद्धतीदेखील समाधानकारक आहे. मात्र, स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. प्रशासनाने स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- प्रदीप आडे, रुग्णांचे नातेवाईक