इर्विन रुग्णालयातील बाळांचे वाॅर्ड हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:14 AM2021-09-27T04:14:15+5:302021-09-27T04:14:15+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये लहान मुलांवर उपचार केला जातो. सध्या वातावरण आरोग्यास अपायकारक असल्याने लहान मुलांना ...
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये लहान मुलांवर उपचार केला जातो. सध्या वातावरण आरोग्यास अपायकारक असल्याने लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला, न्युमोनिया, मेंदूज्वर, अस्थमासह अन्य आजारांनी ग्रासले आहेत. यातच डेंग्यूची साथ सुरू असल्याने उपचारार्थ आलेल्या मुलांचा ताप उतरत नव्हते. त्यामुळे काही मुलांचे रक्तजल नमुने तपासणी केले असता, डेंग्यू निगेटिव्ह आढळून आले. मात्र, त्यांच्या शरीरातील प्लेटलेट कमी झाल्याचे निदानदेखील झाले आहे. त्यामुळे अशा रुग्णांना डेंग्यू आजारावरील उपचार देण्यात येत असल्याची माहिती तेथील बालरोगतज्ज्ञांनी दिली.
बॉक्स
बेड २६ अन् रुग्ण ३०
इर्विन रुग्णालयातील वाॅर्ड ५ मध्ये बाळांच्या उपचारार्थ २६ बेड उपलब्ध असताना रुग्णसंख्या वाढल्याने काहींना खाली उपचार घेण्याची वेळ आली. त्यामुळे गुरुवारी एकूण ३० मुले तेथे उपचार घेताना दिसून आले.
--
ऑक्टोबरमध्ये कोरोना वाढण्याची शक्यता
सध्या उपचारार्थ येणाऱ्या प्रत्येक मुला-मुलींचे आर्टिफिशियल सॅम्पल आपण कोरोना चाचणीकरिता पाठवित आहोत.ते कोरोना निगेटिव्ह आढळून आले असले तरी ऑक्टोबर महिन्यात मुलांना कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोट
सध्या सर्दी, ताप, खोकला, न्युमोनिया, अस्थमा, मेंदूज्वरचे रुग्ण आहेत. ऑगस्ट महिन्यात १० ते १२ मुलांना डेंग्यू आढळून आला. मात्र, आता ४ ते ५ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळत आहे.
- डॉ. ऋषिकेश नागलकर,
बालरोगतज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय