‘इर्विन’चे रक्त गोठलेलेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:25 PM2017-11-01T23:25:10+5:302017-11-01T23:25:27+5:30

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. गत सहा महिन्यांपासून परिस्थिती ‘जैसे थे’ असून, रक्तपेढीला मनुष्यबळाचा अभाव आहे.

Irwin's blood is frozen! | ‘इर्विन’चे रक्त गोठलेलेच!

‘इर्विन’चे रक्त गोठलेलेच!

Next
ठळक मुद्देजिल्हा सामान्य रुग्णालय : रक्तदान शिबिरात घट, रुग्णांचा जीव टांगणीला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. गत सहा महिन्यांपासून परिस्थिती ‘जैसे थे’ असून, रक्तपेढीला मनुष्यबळाचा अभाव आहे. स्वेच्छेने रक्तदान आणि शिबिरांमध्ये कमालीची घट झाल्यामुळे जिल्हा रक्तपेढीतच रक्त गोठलेले आहे.
जिल्हाभरातील रुग्णांचा डोलारा सांभाळणाºया इर्विनमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे उपचारार्थ दाखल रुग्णांचा जीव टांगणीला असे चित्र आहे. येथील रक्तपेढीतून जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा क्षय रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना गरजेनुसार रक्तपुरवठा केला जातो.
यावर्षी उन्हाळ्यातील मे, जून आणि पावसाच्या चार महिन्यात फारसे रक्तदान शिबिरांचे आयोजन झाले नाही. रक्त कमी आणि रुग्णांची मागणी अधिक अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनासमोर अनेक समस्या असल्याचे जिल्हा रक्तपेढीचे डॉ. विलास जाधव यांनी सांगितले. रुग्णालयात दरदिवशी १५ ते २० पिशव्यांची गरज आहे. मात्र, ५ ते ७ रक्तदात्यांकडून स्वेच्छेने रक्तदान होते. रक्तपेढीत रक्ताचा साठा ८ ते १० दिवस पुरेल इतकाच असून, काही गटांचा रक्तसाठा हा शून्यावर आहे.
रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे नातेवाइकांना रक्तदाते शोधून आणण्यासाठी दमछाक होत आहे. बºयाचदा खासगी रक्तपेढीतून पिशव्या विकत घेण्याचा प्रसंग ओढावत आहे. बुधवारी रक्तपेढीत ए आणि बी रक्तगटाच्या पिशव्यांची चणचण आहे. या रक्तगटासाठी दोन रुग्णांना पायपीट करावी लागली. पीडीएमसी, बालाजी ब्लड बँक आणि बडनेºयातील संत गाडगेबाबा रक्तपेढीतही रक्ताचा तुटवडा आहे.
युवकांनी पुढे यावे
रक्तदानाचे मोल नाही. एकवेळी कुणीही पैसे देऊ शकेल. पण, रक्त देणार नाही. त्यामुळे रक्तदानाच्या महाकुंभात युवकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा रक्तपेढीचे तंत्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी केले.
आठ रक्त संकलन केंद्रे
जिल्ह्यात धारणी, चिखलदरा, चुरणी, वरुड, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर आणि जिल्हा स्त्री रुग्णालय अशी एकूण आठ रक्त संकलन केंद्र आहे. रुग्णांचा मागणीनुसार या संकलन केंद्राहून रक्ताचा पुरवठा केला जातो. नव्याने धारणी व वरुड येथे शासकीय रक्त संकलन केंद्राला तत्त्वत: मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
प्रचार मोहिमेचा अभाव
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत साठा कमी असताना अधिकारी, कर्मचारी स्वत:हून शिबिरांसाठी बाहेर पडत नाही. केवळ परिपत्रक काढून ऐच्छिक रक्तदान करण्याचे आवाहन केले जाते. त्यामुळे अशा आवाहनांमुळे किती रक्तसाठा उपलब्ध होईल, हासुद्धा संशोधनाचा विषय आहे.

रक्ताचा थोडा तुटवडा असला तरी या आठवड्यात रक्तदान शिबिरांच्या आयोजनात वाढ झाली आहे. हिवाळा ऋतू प्रारंभ झाला की रक्तदानात भर पडते. रक्ताच्या तुटवड्याची समस्या लवकरच दूर होईल.
- श्यामसुंदर निकम
जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Irwin's blood is frozen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.