हे ‘व्हाईट वॉश’ मंत्रिमंडळ आहे का ? यशोमती ठाकूर यांचा खोचक प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2022 07:51 PM2022-08-09T19:51:37+5:302022-08-09T19:52:05+5:30
Amravati News शिंदे-फडणवीस सरकारचे हे ‘व्हाईट वॉश’ मंत्रिमंडळ आहे का ? असा खोचक प्रश्न काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
अमरावती : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना जाणीवपूर्वक डावलले गेल्याकडे लक्ष वेधतानाच शिंदे-फडणवीस सरकारचे हे ‘व्हाईट वॉश’ मंत्रिमंडळ आहे का ? असा खोचक प्रश्न काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. ९ ऑगस्ट क्रांतिदिनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आजादी गौरव पद यात्रेनिमिताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी माध्यमाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज्य मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे एखादा विनोद व्हावा अशी कृती दिसत असल्याचे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. एकाही महिलेला मंत्रिपदी संधी दिली नाही, हे आश्चर्य आहे, तर भाजप नावाची वॉशिंग पावडर चारित्र्य साफ करत असल्याने हे शिंदे-फडणवीस सरकारचे हे ‘व्हाईट वॉश’ मंत्री मंडळ आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवाय आमदार संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने आता भाजपच्या चित्रा वाघ यांची भूमिका काय असेल याकडेही लक्ष वेधले आहे.