मासे पकडण्यासाठी गेलेला इसम बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:16 AM2021-08-15T04:16:00+5:302021-08-15T04:16:00+5:30
मंगरूळ दस्तगीर : मासे पकडण्यासाठी गेलेला इसम बेपत्ता झाला आहे. सात तासांनंतरही पोलिसांना तथा रेस्क्यू टीमला या इसमाचा शोध ...
मंगरूळ दस्तगीर : मासे पकडण्यासाठी गेलेला इसम बेपत्ता झाला आहे. सात तासांनंतरही पोलिसांना तथा रेस्क्यू टीमला या इसमाचा शोध लागलेला नाही.
दामोदर बापूराव नेवारे (४५, रा. चिंचपूर) असे या इसमाचे नाव आहे. चिंचपूर येथील लोअर वर्धा प्रकल्पात अंदाजे सात किमी परिसरात त्याच्यासह फिर्यादी गोवर्धन मेश्राम हे शुक्रवारी रात्री मासे पकडण्याकरिता नावेने गेले होते. मद्यधुंद अवस्थेतील दामोदर हा जेवण करून बोटीमध्ये झोपला. त्यावेळी गोवर्धन हा धरणाच्या पाण्यात जाळे लावत होता. हे काम आटोपल्यानंतर तो बोट उभी केल्याचे जागेवर आला असता तेथे दामोदर नव्हता आणि बोटही नव्हती. माहिती मिळाली तेव्हापासून रेस्क्यू टीमसह गावातील भोई समाजबांधव, पट्टीचे पोहणारे व पोलीस चमू दामोदरचा शोध घेत आहेत. अद्यापही त्याचा थांगपत्ता लागला नसल्याची माहिती मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी दिली.