निंबा येथे इसमाला कुऱ्हाडीने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:09 AM2021-04-29T04:09:30+5:302021-04-29T04:09:30+5:30
मंगरूळ दस्तगीर : मद्याच्या अमलात भावाला कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आल्याची घटना निंबा येथे घडली. कुऱ्ऱ्हाड पकडल्यानंतर विळ्याने नाकावर वार ...
मंगरूळ दस्तगीर : मद्याच्या अमलात भावाला कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आल्याची घटना निंबा येथे घडली. कुऱ्ऱ्हाड पकडल्यानंतर विळ्याने नाकावर वार केला. याप्रकरणी जखमी मधुकर देवबाजी धवणे (५०) यांच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी नागसेन लक्ष्मण धवणे याच्याविरुद्ध कलम ३२४अन्वये गुन्हा नोंदविला.
--------------------
माहुली येथे इसमाला दुचाकीची धडक
लेहगाव : माहुली जहागीर ते अमरावती मार्गावर हातगाडी घेऊन येत असलेल्या अब्दुल सत्तार या फळविक्रेत्याला एमएच २७ सीएफ ४०७० क्रमांकाच्या दुचाकीने २५ एप्रिल रोजी धडक दिली. याप्रकरणी हुजेफ अनम अब्दुल सत्तार (१८, रा. चांदूर बाजार) याच्या तक्रारीवरून माहुली जहागीर पोलिसांनी भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला.
-------------------
क्षुल्लक कारणावरून महिलेला मारहाण
नांदगाव खंडेश्वर : लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरा बु. येथे ४० वर्षीय महिलेला तिघांनी काठीने मारहाण केली. ४ एप्रिल रोजी मारहाणीनंतर ती महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झाली. याप्रकरणी मंगळवारी पोलिसांनी बाळू रामचंद्र सरदार, पद्मा बाळू सरदार व अनुज बाळू सरदार यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२५, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.
--------------
दहिगाव रेचा येथे युवकाला मारहाण
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील दहिगाव रेचा येथील देवानंद गुलाबराव सरोदे (२७) या युवकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून गुलाबराव सरोदे याने काठीने मारहाण केली. श्रीकृष्ण मनोहर ठाकरे व मनोहर रामकृष्ण ठाकरे यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.
-----------------
उस्माननगरात बहिणीला भावाकडून मारहाण
अंजनगाव सुर्जी : मद्यपी भावाने घरी वेगळी राहत असलेल्या बहिणीला घराबाहेर निघून जाण्याचे फर्मावून काठीने मारहाण केली. यात डोक्यावर मार लागून ती जखमी झाली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी गुलनाज परवीन अब्दुल गफ्फार (२०, रा. उस्माननगर) हिच्या तक्रारीवरून अब्दुल सलमान अब्दुल गफ्फार (रा. उस्माननगर) याच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला.