बेनोडा आश्रमशाळेला ‘आयएसओ’ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 08:50 PM2017-09-16T20:50:51+5:302017-09-16T20:51:13+5:30
स्थानिक बेनोडा (शहीद) येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले.
देवेंद्र धोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
बेनोडा (शहीद) : स्थानिक बेनोडा (शहीद) येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले. महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती व मागास मुला-मुलींसाठी एकूण ८४ शाळा कार्यरत आहेत. त्यापैकी सहा शाळा अमरावती जिल्ह्यात आहे.
या शाळेने इंग्रजी माध्यमांच्या इतर शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी इयत्ता ६ ते दहावी सेमी इंग्रजी माध्यम सुरू केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला आहे. पायाभूत सुविधांसोबत उत्तम दर्जाचे शिक्षण, निसर्गरम्य शालेय परिसर, स्वच्छता, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, अत्याधुनिक संगणक कक्ष, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक, मार्गदर्शन, पालक व समाज उद्बोधन, सामाजिक व शालेय नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक सहली, वार्षिक स्नेहसंमेलने, कामाचे नियोजन आणि शिस्तीच्या भरवशावर ‘आयएसओ’ दर्जा बहाल करण्यात आला.
जिल्ह्यातील सहा शाळांपैकी तीन शाळा ‘आयएसओ’ मानांकित असून उर्वरित शाळादेखील मानांकन प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत. मागास विद्यार्थ्यांनादेखील स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी दर्जेदार शिक्षणावर भर द्यायला हवा.
- प्राजक्ता इंगळे,
सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, अमरावती
तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचे हे यश असल्याने समाधान वाटते आहे. यासाठी समाज कल्याण कार्यालय, अमरावती आणि शाळेतील सर्व सहकारी कर्मचाºयांनी सहकार्य केले.
- अतुल बोरे,
मुख्याध्यापक, अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, बेनोडा