बडनेºयातील देशी दारु दुकानाचा मुद्दा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 09:52 PM2017-10-16T21:52:10+5:302017-10-16T21:52:30+5:30

बडनेरा जुनीवस्ती बारीपुरास्थित शहीद भगतसिंग चौकात देशी दारु विक्री दुकानाच्या स्थलांतरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

The issue of the country's liquor shops is on the anvil | बडनेºयातील देशी दारु दुकानाचा मुद्दा ऐरणीवर

बडनेºयातील देशी दारु दुकानाचा मुद्दा ऐरणीवर

Next
ठळक मुद्देरवि राणा यांची जिल्हाकचेरीत बैठक : दुकान स्थलांतरणावर एकमत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: बडनेरा जुनीवस्ती बारीपुरास्थित शहीद भगतसिंग चौकात देशी दारु विक्री दुकानाच्या स्थलांतरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यासाठी आ. रवि राणा हे आग्रही असून सोमवारी जिल्हाकचेरीत पार पडलेल्या बैठकीत सदर दारु विक्रीचे दुकान लवकरच स्थलांतरीत होईल, याविषयी एकमत झाले.
जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या दालनात देशी दारु विक्री दुकान स्थलांतरणाच्या मुद्द्यावरुन घेण्यात आलेल्या बैठकीत नागरिकांनी दारु विक्री दुकानापासून होत असलेल्या त्रासाचा पाढा वाचला. सदर दारु दुकानापासून हाकेच्या अंतरावर शाळा, नागरीवस्ती, धार्मिकस्थळ तसेच ये-जा करण्याचा मुख्य रस्ता आहे. दारु विक्रीमुळे मद्यपींचा गोंधळ रस्त्यावरच राहत असल्याने महिला, युवतींना या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणे कठीण झाल्याची कैफियत जिल्हाधिकारी बांगर, आ. राणांच्या पुढ्यात ठेवली. परवानाधारक राजेश जयस्वाल यांनी प्रशासनाला प्रतीज्ञापत्र सादर करुन दोन महिन्यांत सदर दुकान स्थलांतरीत केली जाईल, असे अभिवचन दिल्याचेही नागरीकांनी सांगितले. दरम्यान आ. रवि राणा यांनी नागरिकांची मागणी आणि त्रस्त झालेल्यांची कैफियत ऐकून देशी दारु विक्रीचे दुकान लवकरच स्थलांतरण करण्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घ्यावा, असे सांगितले. जिल्हा प्रशासन, राज्य उत्पादक शुल्क विभाग कारवाई करेल, असे आ. राणा म्हणाले. यावेळी एक्साईजचे अधीक्षक प्रमोद सोनोने हे देखिल उपस्थित होते. नीळकंठ कात्रे, विजय नागपुरे, किशोर अंबाडकर, अरुण साकुरे, उत्तमराव भैसने, सुनील राणा, आशीष कावरे, गिरीश कासट, अजय मोरया, दिनेश टेकाम, देवानंद काठोडे, हर्षल रेवणे आदींनी देशी दारु विक्री दुकानाच्या स्थलांतरणाचा प्रश्न जिल्हाधिकाºयांच्या पुढ्यात ठेवला.

दारु विक्रीचे दुकान नियमानुसारच स्थलांतरीत होईल. परवानाधारकांचे अर्ज आल्यानंतर ‘शिफ्टिंग’ करू. त्यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
- अभिजित बांगर
जिल्हाधिकारी, अमरावती.

Web Title: The issue of the country's liquor shops is on the anvil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.