अतिक्रमणाचा मुद्दा तापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 01:32 AM2019-03-08T01:32:48+5:302019-03-08T01:33:07+5:30

तालुक्यातील वणी ममदापूर गटग्रामपंचायतीतील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्यावरून दोन ग्रामस्थ परस्परांसमोर उभे ठाकले. ते दोघेही ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. उपोषणकर्ते एकमेकांचे नातेवाईक आहेत.

The issue of encroachment was heated | अतिक्रमणाचा मुद्दा तापला

अतिक्रमणाचा मुद्दा तापला

Next
ठळक मुद्देवणी ममदापूर : दोघांचे परस्पर विरोधी उपोषण, ग्रामपंचायतसमोर ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : तालुक्यातील वणी ममदापूर गटग्रामपंचायतीतील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्यावरून दोन ग्रामस्थ परस्परांसमोर उभे ठाकले. ते दोघेही ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. उपोषणकर्ते एकमेकांचे नातेवाईक आहेत.
सरकारी जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, ही मागणी घेऊन मनोहर पुनसे हे ५ मार्च रोजी, तर ६ मार्च रोजी दिव्यांग महिला ज्योती बाबाराव वडे या त्यांच्याविरुद्ध उपोषणास बसल्या. दोघांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण मंडप उभारले. सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याबाबत त्यांनी यापूर्वीही एकमेकांविरुद्ध अनेक तक्रारी केल्या आहेत. ममदापूर हे शंभर वर्षांपूर्वी वसलेले गाव. कुटुंबसंख्या वाढल्याने बहुतांश नागरिकांकडे जागेचा मालकत्वाचा दस्तावेज नाही. प्रत्येकाने आपआपल्या घरासमोरील जागा ताब्यात घेऊन बांधकाम केले. ग्रामपंचायतीने भूमिअभिलेखकडे गावठाण नकाशा व पीआर कार्ड मिळण्याबाबत लेखी स्वरूपात मागणी केली. मात्र, हे गाव नझूल परिक्षेत्राबाहेर असल्याने अभिलेख उपलब्ध होऊ शकला नाही. त्यानंतरही आपणच केलेले बांधकाम वैध, असा अनेकांचा दावा आहे. त्यामुळे दोघेही परस्परांसमक्ष उभे ठाकले आहे.

Web Title: The issue of encroachment was heated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.