जलव्यवस्थापन समितीच्या सभेत गाजला लीकेजचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:32 AM2018-10-05T01:32:13+5:302018-10-05T01:33:14+5:30

जिल्ह्यातील मे ते आॅगस्ट महिन्यात ज्या ७ गावांमध्ये साथरोगाची लागण झाली, त्याला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेतील पाइपलाइनचे लीकेजेस कारणीभूत ठरल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या जलव्यस्थापन समितीच्या सभेत गुरूवारी चांगलाच गाजला.

The issue of lease of Gazla in the meeting of the Water Management Committee | जलव्यवस्थापन समितीच्या सभेत गाजला लीकेजचा मुद्दा

जलव्यवस्थापन समितीच्या सभेत गाजला लीकेजचा मुद्दा

Next
ठळक मुद्देपदाधिकारी आक्रमक : जिल्ह्यातील सात गावांमध्ये साथरोगांची लागण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील मे ते आॅगस्ट महिन्यात ज्या ७ गावांमध्ये साथरोगाची लागण झाली, त्याला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेतील पाइपलाइनचे लीकेजेस कारणीभूत ठरल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या जलव्यस्थापन समितीच्या सभेत गुरूवारी चांगलाच गाजला.
जिल्हा परिषद जलव्यस्थापन समितीची सभा ४ आॅक्टोबर रोजी विविध विषयाला अनुसरून अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. यावेळी सभेत आरोग्य सभापती बळवंत वानखडे यांनी जिल्ह्यातील धारवाडा, सोनापूर, सुफलवाडा, मोरचुद, येरला, लाखेवाडा आणि चोबिदा या ७ गावांमध्ये मे ते आॅगस्ट महिन्या दरम्यान ग्रॅटो, कॉलरा या साथरोगाची लागण झाली होती. दरम्यान या साथरोगाची लागण होण्याची कारणी करण्याचा मुद्दा मागील जलव्यवस्थापन समिती सभेत उपस्थित केला होता. त्यानुसार याबाबतचा अहवाला सभेच्या पटलावर प्रशासनाने ठेवला. यात पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या योजनेच्या पाणी पुरवठा करणाºया पाईप लाईनचे लीकेजस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे लीकेजेस दुरूस्तीची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न उपस्थित करीत वानखडे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विषय तापल्याने अखेर यापुढे पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन लीकेज असल्यास ते त्वरित दुरूस्त करावे आणि आरोग्य आणि पाणी पुरवठा विभागाने समन्वयातून काम करावे अन्यथा दोषींवर कारवाई करण्याचा ठराव या सभेत पारित करण्यात आला. याशिवाय दर्यापूर मतदार संघातील १२५ गावांच्या शहानूर पाणीपुरवठा योजनेची पाईप लाईनवर नव्याने ७९ गावांना जोडण्यात आली आहेत. त्यामुळे या गावांना पाणीपुरवठा होत नाही. परिणामी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. परंतु, हा अतिरिक्त भार कमी करून नव्याने उपाययोजना करण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग टाळाटाळ करीत असल्याचे बळवंत वानखडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर मजीप्रा अधिकारी अपेक्षित उत्तर देऊ न शकल्याने पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश झेडपी अध्यक्षांनी मजीप्रा अधिकाऱ्यांना दिलेत. यावेळी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सदस्या गौरी देशमुख, वासंती मंगरोळे, पूजा हाडोळे, अनिता मेश्राम यांनी पाणीपुरवठा, सिंचन विभागाचे मुद्दे मांडलेत.

सिंचन तलावात दारूची निर्मिती
तिवसा तालुक्यातील धोत्रा आणि वऱ्हा गावाच्या मध्यसीमेवर दहीगाव धानोरा तलाव आहे. सध्या या तलावात पाणी नसल्यामुळे अवैध विक्रेते चक्क या तलावाच्या मध्यभागी मोठ्या थाटून दारू काढत असल्याचा मुद्दा गौरी देशमुख यांनी जलव्यस्थापन सभेत मांडला.यावर प्रशासनाने हा तलाव झेडपीचा नसून जलसंपदा विभागाचा असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान सभेला उपस्थित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसात तक्रार देवून अवैध धंदे होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन सभागृहात दिले.

पाणीटंचाईचा घेतला आढावा
जिल्हाभरात कमी पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे टंचाईची झळ बसण्याची दाट शक्यता आहे. पाणी टंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा विभागाने काय उपाययोजना केल्यात, असा प्रश्न गौरी देशमुख व अन्य सदस्यांनी उपस्थित केला. यावर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी टंचाई आराखड्याच्या तयारीसाठी तालुकानिहाय बैठकी सुरू आहेत. लवकरच जिल्ह्याचा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जाणार असल्याचे सांगितले.

Web Title: The issue of lease of Gazla in the meeting of the Water Management Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.