आयुक्तांनी नाकारला रस्ते हस्तांतरणाचा मुद्दा
By admin | Published: April 19, 2017 12:06 AM2017-04-19T00:06:12+5:302017-04-19T00:06:12+5:30
रस्ते हस्तांतरणाचा कुठलाही प्रस्ताव महापालिकेसमोर सध्या तरी नाही. आल्यास तो सभागृहासमोर ठेवला जाईल, ...
महामार्गांचा हत्ती पोसायचा कुणी? : नगसेवकांचा विरोध
अमरावती : रस्ते हस्तांतरणाचा कुठलाही प्रस्ताव महापालिकेसमोर सध्या तरी नाही. आल्यास तो सभागृहासमोर ठेवला जाईल, असे आयुक्तांनी आमसभेदरम्यान मंगळवारी स्पष्ट केले. नवसारी ते अमरावती शहरात येणारा कॅम्प शॉर्ट रोड राज्यमार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करून घेण्याची मनपा प्रशासनाची योजना आहे काय, असा प्रश्न मंगळवारच्या आमसभेत प्रशांत डवरे यांनी उपस्थित केला. राज्य शासनाने महापालिकेकडे रस्ता हस्तांतरित केल्यास त्याची देखरेख ठेवण्याइतपत मनपाची आर्थिक स्थिती बळकट आहे काय, जर नसेल तर मनपा प्रशासनातर्फे राज्य मार्ग हस्तांतरण रोखण्याबाबत काय प्रयत्न झालेत, अशी विचारणा डवरे यांनी केली. त्यावर महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी केवळ ‘नाही’असे उत्तर दिले. त्याचवेळी डवरे आणि प्रशासनामध्ये खडाजंगी झाली.
आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे मिळाले असले तरी अन्य दोन उपप्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, अशी विचारणा करीत डवरे यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. बांधकाम विभागाचे रस्ते हस्तांतरित करून त्यांची देखभाल-दुरूस्ती करण्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती आहे काय, याचे उत्तर मात्र डवरेंना मिळाले नाही. तथापि असा प्रस्ताव आल्यास तो सभागृहासमोर ठेवण्यात येईल,असे आयुक्तांनी स्पष्ट केले. यात बसपचे गटनेते चेतन पवार यांनी असा एक प्रस्ताव यापूर्वीही सभागृहासमोर आला होता.
‘स्वीकृत’वरून खडाजंगी
अमरावती : तो फेटाळण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती सभागृहात दिली. रस्ते हस्तांतरणाबाबत ‘लोकमत’ने चालविलेल्या वृत्तमालिकेचा संदर्भ देऊन बसपचे गटनेते चेतन पवार यांनी याबाबत प्रशासनाला विचारणा केली. रस्ते हस्तांतरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिती आहे की नाही, हा प्रश्न गौण ठरत असल्याचे आयुक्त म्हणाले. मद्यविक्रीपासून मिळणारा कोट्यवधींचा महसूल वाचविण्याकरिता रस्त्यांची मालकी बदलविण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे.
पाच स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा विषय मंगळवारच्या आमसभेत ठेवला होता. मात्र, प्रशासनाने हा विषय स्थगित ठेवण्याचा मुद्दा मांडला. स्वीकृत सदस्य निवडायचेच नव्हते, तर विषय पत्रिकेत विषय का ठेवला, असा प्रश्न विलास इंगोले यांनी उपस्थित केला. स्थायीचे सभापती तुषार भारतीय यांच्याशी त्यांची खडाजंगी झाली. शाब्दिक वादावादीनंतर हा विषय पुढच्या आमसभेत ठेवण्याचे निर्देश पिठासीन सभापतींनी दिले. स्वीकृत सदस्यांच्या संख्येत वाढ अपेक्षित असल्याने आमसभेत स्वीकृत सदस्यांची निवड केलेली नाही.
महानगर पालिकेच्या मंगळवारच्या आमसभेत चारही विषय समिती सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.महिला तथा बाल कल्याण समितिमध्ये जयश्री कुऱ्हेकर, नीलिमा काले, वंदना कंगाले, साहेब बी कय्युम शाह, कुसुम साहू, रेखा भुतड़ा, संगीता बुरंगे, नीता राऊत, जयश्री डहाके यांचा समावेश आहे.
विधी समितीत सुनंदा खरड, सुमति ढोके, प्रणित सोनी, संजय वानरे, वंदना हरणे, मोहम्मद साबिर, आस्मां फिरोज, हफीजाबी नूर खां तथा मंजुषा जाधव यांचे वर्णी लागली आहे.तर पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिति चेतन गावंडे, गीता पडोले, पद्मजा कौंडण्य, स्वाती कुलकर्णी, विजय वानखड़े, अफजल हुसैन, सलीम बेग, अब्दुल वसीम मजीद तथा डॉ. राजेन्द्र तायडे यांना समावेश आहे.. शहर सुधार समितीत शिरीष रासने, राजेश साहू, गोपाल धर्माले, अजय सारसकर, नूतन भुजाड़े, रूबीना तबस्सुम हारून अली, सुनीता भेले, प्रशांत डवरे तथा भारत चौधरी यांना संधी देण्यात आली आहे.
वृक्ष प्राधिकरणावर ९ सदस्य
आमसभेदरम्यान वृक्ष प्राधिकरणावर ९ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. नव्याने निवडण्यात आलेल्या सदस्यांमध्ये भाजपचे श्रीचंद तेजवाणी, अजय गोंडाणे, धीरज हिवसे, प्रमिला जाधव आणि वंदना मडघे यांच्यासह एमआयएमचे अब्दुल नाजिम, काँग्रेसचे प्रशांत डवरे आणि प्रदीप हिवसे आणि शिवसेनेचे प्रशांत वानखडे यांचा समावेश आहे.