भातकुली तहसील स्थानांतरणाचा मुद्दा तापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 06:00 AM2019-11-29T06:00:00+5:302019-11-29T06:00:58+5:30
भातकुली तहसील कार्यालय हे सध्या अमरावतीत आहे. ते भातकुलीत स्थानांतरणासाठी आमदार रवी राणा यांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली व प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना आदेश देऊन तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरित करण्याचे आदेश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील भातकुली तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरण करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी २७ नोव्हेंबर रोजी काढले. त्यानुसार २८ नोव्हेंबर रोजी प्रक्रिया सुरू झाली. परंतु तहसील कार्यालयातील शासकीय दस्तऐवजांची फेकाफेक करीत साहित्य उचलण्यास काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुरूवात केली. या प्रकारावर भातकुली तालुका काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी तीव्र आक्षेप दर्शविला. याबाबत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गुरूवारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकंदर खॉ पठाण व सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदनातून केली.
भातकुली तहसील कार्यालय हे सध्या अमरावतीत आहे. ते भातकुलीत स्थानांतरणासाठी आमदार रवी राणा यांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली व प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना आदेश देऊन तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी नवाल यांनी २७ नोव्हेंबर रोजी त्याबाबत योग्य कार्यवाहीचे निर्देश तहसीलदार भातकुली यांना दिले. त्यानुसार तहसील कार्यालय भातकुली येथे स्थानांतरित करण्याची प्रक्रिया २८ नोव्हेंबर रोजी सुरू केली. यावेळी युवा स्वाभिमान व भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तहसीलमधील शासकीय दस्तऐवज उचलून वाहनात टाकले. साहित्यांची फेकाफेक केली, असा आरोप काँग्रेस, शिवसेना पदाधिकाºयांनी केला आहे. त्यामुळे शासकीय दस्तऐवज जबाबदारीने शासकीय कर्मचाºयांकडूनच हलविणे योग्य आहे. परंतु राजकीय पक्षाचे कार्यकर्ते साहित्य उचलण्याच्या कामात हस्तक्षेप करणे योग्य नसल्याने यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर तक्रारीवरून दोषीवर कारवाई करावी व भातकुली तहसील कार्यालय स्थलांतरित करू नये, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकंदर खॉ पठाण, शिवसेनेचे कैलास औघड, धनश्याम कुचे, सुनील जुनघरे, मोबीन, हफीज जादेव, दिनेश वंजारी, संजय कोलटके व नगरिकांनी केली आहे.