दाखले आॅनलाईन ट्रान्सफर, बोगस पटसंख्येला चाप
By admin | Published: September 20, 2016 12:22 AM2016-09-20T00:22:08+5:302016-09-20T00:22:08+5:30
बोगस पटसंख्या दाखवून शिष्यवृत्तीसह विविध शासकीय योजनांचा लाभ विळविण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी
बदल : लाखो विद्यार्थ्यांना मिळणार आयडी, जाचातून सुटका
अमरावती : बोगस पटसंख्या दाखवून शिष्यवृत्तीसह विविध शासकीय योजनांचा लाभ विळविण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी शिक्षण विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या सरल संगणक प्रणालीद्वारे आता विद्यार्थ्यांना आधार कार्डशी लिंक केली जाणार आहे.
याद्वारे विद्यार्थी, शिक्षक व शाळांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. आता प्रत्येक विद्यार्थ्याला सांकेतिक क्रमांक (आयडी) दिला जाणार आहे. या आयडीमुळे बोगस पटसंख्येला चाप बसणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांचे दाखलेही आॅनलाईन ट्रान्सफर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांची कागदपत्राच्या जाचातून लवकरच कामयची सुटका होणार आहे. शिक्षण विभागामार्फत शिक्षण व्यवस्थेच्या कामाकाज आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करीत पारदर्शकता आणण्यासाठी सुरू झालेल्या सरल अर्थात सिस्टीमॅटिक अँड मिनिस्ट्रेन्हीव रिफोर्मस फॉर अचिन्हिंग लर्निंग बाय स्टुडंट या संगणक प्रणालीमध्ये विद्यार्थी शिक्षक व शाळा याची सर्व माहिती 'अपलोड' करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या माहितीला आता आधार कार्डची जोडणी केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या माहितीला आता आधार कार्डची जोडणी केली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र ओळख क्रमांकाचे कार्ड मिळणार आहे. एकदा मिळालेला आयडी हा कायम राहणार आहे. एक च विद्यार्थी दोन शाळांमध्ये प्रविष्ट राहू शकत नाही. त्यामुळे बोगस पटसंख्या दाखवताच येणार नाही. एवढेच नव्हे तर सरलमुळे एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या शाळेत प्रविष्ट होण्यासाठी आता दाखला देण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांच्या आयडीद्वारे 'आॅनलाईन ट्रान्सफर' होणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कामगदपत्रांच्या जाचातून विद्यार्थी पालकांसह शिक्षकांची सुटका होणार आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यात
खात्यात वळल्यामुळे व आधार कार्डची जोडणी झाल्यानंतर शासनाच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती वाटप प्रक्रियेत पारदर्शकता येऊन गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
जिल्ह्यात १ हजार ६०२ शाळा असून यामधील लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुतांश शाळांमध्ये आधार नोंदणी मोहीम राबविली आहे. उर्वरित शाळांमध्ये मोहीम सुरू होणार आहे. त्यानंतर सरल प्रणालीत आधार लिंक केली जाईल.
- एस.एम.पानझडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, अमरावती