'तो' बँक खातेधारक आसामचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:51 PM2017-10-04T23:51:00+5:302017-10-04T23:51:14+5:30

फेक कॉल न करताच बँक खात्यातून ८० हजारांची रोख पळविणारा आरोपी आसाममधील बारापट्टा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

'It' bank account holder Assam | 'तो' बँक खातेधारक आसामचा

'तो' बँक खातेधारक आसामचा

Next
ठळक मुद्देसायबर गुन्ह्याच्या तपासाला वेग : एसबीआयची सायबर टीमकडूनही चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : फेक कॉल न करताच बँक खात्यातून ८० हजारांची रोख पळविणारा आरोपी आसाममधील बारापट्टा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या शोधार्थ शहर कोतवाली पोलीस आसामला जाणार आहेत. या फसवणुकीच्या प्रकरणाविषयी स्टेट बँक आॅफ इंडियाची सायबर चमुने तपासकार्य सुरू केले आहे.
श्रीकृष्ण पेठ येथील रहिवासी अरविंद सिताराम हाडोळे (६२) यांच्या बँक खात्यातून ८० हजार रुपये काढल्याचे संदेश आला. त्यांना कुणीच एटीएमविषयी माहिती विचारली नसतानाही त्यांच्या बँक खात्यातून रोख काढण्यात आली. बँक खात्यातून पैसे काढल्याची ही तिसरी घटना अमरावती शहरात घडली आहे.
बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
अमरावती : जिल्ह्यातील लाखो खातेधारकांच्या बँक खात्यातील पैशांवर सायबर गुन्हेगारांचे लक्ष असल्याचे यावरून दिसून येत आहे. हाडोळे यांच्या खात्यातील ४० हजारांची रोख दुसºयाच व्यक्तीच्या नावे वळती झाल्याचे बँक विवरणावरून निदर्शनास आले. तीनही घटना एकसारख्या असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. हाडोळे यांच्या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी चौकशी केली असता त्यामध्ये आसामच्या बारापट्टा येथील अतुल ताडुलकर नावाच्या इसमाच्या बँक खात्यात ४० हजार रुपये वळते झाल्याचे आढळून आले, तर अतुल ताडुलकर याने ४० हजारांचा विड्राल केला असल्याने खात्यात केवळ १ हजार ८०० रुपये शिल्ल राहिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे आता पोलीस अतुल ताडुलकरच्या शोधार्थ आसामला रवाना होणार आहेत. बँक खातेदारांची माहिती बँकेजवळ गोपनीय ठेवण्यात येते. खातेदाराच्या संमतीशिवाय त्यांच्या खात्यात कोणतेही व्यवहार केले जात नाही. मात्र, खातेदारांना न सांगताच त्यांच्या खात्यातील रक्कम काढण्याचा हा गजब प्रकार असून एसबीआयची विश्वासार्हता गमावून बसणारा असल्याची खंत ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

बँक खातेदाराची ४० हजारांची रक्कम आसामच्या बारापट्टा येथील एका इसमाच्या खात्यात वळती झाली आहे. त्या आरोपीच्या चौकशीसाठी पोलिसांना आसामला पाठविले जाईल.
- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे

आणखी एका खात्यातून सव्वा लाखांची रोख गायब
आठ दिवसांत सायबर गुन्ह्याची ही तिसरी घटना उघड झाली आहे. अशा घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी तपासाला गती देणे गरजेचे आहे. चंदननगरातील रहिवासी गोपाळ विनायक इंगळे यांचे साईनगरस्थित एसबीआयमध्ये बचत खाते आहे. २७ सप्टेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर संदेश प्राप्त होताच त्यांना धक्काच बसला. त्यांच्या खात्यातून ४० हजार वळते केल्याचे लक्षात आले. १० हजार रुपये काढल्याचे दिसले. दुसºयाही दिवशी त्यांच्या खात्यातून ७ हजार रुपये दुसºयाच्या खात्यात वळते करण्यात आले. ४० हजारांची रोख काढल्याचे दिसून आले. अशाप्रकारे त्यांच्या खात्यातून १ लाख २७ हजारांची रोख अज्ञाताने काढल्याचा धक्का त्यांना बसला. यासंदर्भात इंगळे यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

Web Title: 'It' bank account holder Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.