सालदार मिळणे झाले कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:12 AM2021-04-18T04:12:21+5:302021-04-18T04:12:21+5:30
लॉकडाऊनचा फटका : पीक परिस्थिती जेमतेमच कावली वसाड : सलगच्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांना सालदार ...
लॉकडाऊनचा फटका : पीक परिस्थिती जेमतेमच
कावली वसाड : सलगच्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांना सालदार मिळणे कठीण झाले आहे. कमी पैशात सालदार मिळणे शेतकºयांना कढीण झाल्याने शेतीच्या मशागतीला मर्यादा आल्या आहेत. तर सालदारांनी आपल्या वार्षिक मोबदल्यात वाढ केल्याने शेतकºयांच्या अडचणीतब भर पडली आहे.
ग्रामीण भागात शेतीची मशागत ही गुढीपाडवा या मराठी नववषार्पासून सुरुवात होते. शेतकरी आपल्या शेतात मशागतीला खºया अर्थाने या दिवसापासून सुरुवात करतात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी असल्याने याच दिवसापासून आपल्या गुराढोरांचे व शेतीचे काम करण्यासाठी सालदार या दिवसापासून आपले साल मांडतात. ज्या शेतकºयांना बºयापैकी उत्पन्न होते, ते शेतकरी आपल्या सालकºयाला पैशाच्या रूपात व धान्य रूपात वार्षिक सालाची या दिवसापासून नोंदणी करतात. मात्र गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकºयांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी होत असल्याने सालदारांना मोबदला कसा द्यावा, या विचारात शेतकरी पडला आहे.
यावर्षी तालुक्यातील शेतकºयांना बºयापैकी उत्पादन झाले. ते उन्हाळी पिकेही घेत आहेत. त्यामुळे शेतीच्या कामासाठी सालदार ठेवला पाहिजे, या विचारात शेतकरी असताना सालदारांनी मात्र आपला वार्षिक मोबदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. सालदार जेव्हा आपले साल मांडण्याच्या विचारात असताना शेतकºयांपुढे किमान ८० हजार ते ८५ हजार इतका मोबदला मिळावा अशी अपेक्षा सालदारांनी व्यक्त केली आहे. तरी तो मोबदला देण्यासाठी शेतात अधिक उत्पादन शेतकरी काढत आहे. मात्र ग्रामीण भागात सालदार मिळणे ही मोठी समस्या झाल्याची शेतकरी सांगत आहे.
१५ ते २० हजारांची वाढ
ग्रामीण भागात खरिप व रबी हंगामातील शेतीकामासाठी मजुराला ३०० रुपये व महिला मजुराला २०० रुपये मजुरी दिली जाते. संपुर्ण महिनाभर काम केल्यास एका मजुराच्या घरी सरासरी ८ ते ९ हजार रुपये येतात. मात्र यंदा एैन हंगामाच्या वेळी अवकाळी बरसल्याने शेतकºयांसह मजुरांची मजुरी देखील बुडाली. त्यामुळे सालदारांनी आपला मेहनताना वाढवला असला तरी आज पर्यंत सालदारांना किमान बारा महिन्याचे ६० ते ६५ हजार रुपये इतका मोबदला दिला जात होता. त्यावेळेला त्यांना गुराढोरांचे कामे करावी लागत होते. आज शेतीची प्रत्येक कामे यंत्राच्या साह्याने होत असल्याने बैलजोडीची संख्याही कमी झाली आहे. त्यांचे काम कमी झाले. परंतु तरीही सालदार मोठ्या प्रमाणात मोबदला मागतात.