मोकळा प्लॉट सांभाळणे झाले कठीण, तीन वर्षात शहरात १३ प्लॉट हडपले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:05+5:302021-06-25T04:11:05+5:30

अमरावती/ संदीप मानकर गत तीन वर्षात शहरात चक्क १३ प्लॉट आरोपींनी हडपल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी ...

It became difficult to manage vacant plots, 13 plots were grabbed in the city in three years! | मोकळा प्लॉट सांभाळणे झाले कठीण, तीन वर्षात शहरात १३ प्लॉट हडपले!

मोकळा प्लॉट सांभाळणे झाले कठीण, तीन वर्षात शहरात १३ प्लॉट हडपले!

Next

अमरावती/ संदीप मानकर

गत तीन वर्षात शहरात चक्क १३ प्लॉट आरोपींनी हडपल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी इन्वेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवलेला मोकळा प्लॉट सांभाळणे आता कठीण झाले आहे. त्या संदर्भाच्या तक्रारी शहर पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. संबंधित आरोपींविरुद्ध फसवणुकीचा व विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

यामध्ये गाडगेनगर ठाणे हद्दीत आठ प्लॉट हडपले, तर फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील दोन व राजापेठ येथे दोन तर नागपुरीगेट ठाणे हद्दीत एक प्लॉट हडपल्याचा गुन्हा नोंदविला आहे. बनावट कागतपत्रे तयार करून, बनावट खरेदी दाखवून तसेच बनावट पीआर कार्ड तयार करून सदर प्लॉट परस्पर इतरांना विकून टाकल्याचे प्रकरणे समोर आली आहे. काही प्रकरणात एकच प्लॉट दोन ते तीन नागरिकांना विकल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. पोलिसांचा याप्रकरणी गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.

बॉक्स

डीवायएसपींच्या पत्नीचा प्लॉटही विकला

राजापेठ ठाणे हद्दीतील एक प्रकरण असेच समोर आले होते. आता सेवानिवृत्त झालेले डीवायएसपीच्या पत्नीच्या नावाने असलेला नवाथे चौकातील प्लॉट आरोपींना परस्पर विक्री केला होता. जेव्हा डीवायएसपींना हे कळले तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी पत्नीसह तातडीने राजापेठ ठाण्यात धाव घेऊन प्लॉट हडपल्याचा कलम ४२० व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला. सदर प्रकरण २०२० या वर्षात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

बॉक्स

अशी केली जाते फसवणूक

ज्याची मालकी हक्क असलेला प्लॉट आहे त्यांच्या नावाचा वापर करून बनावट कागतपत्रे तयार करणे बनावट खरेदी तयार करून त्याजागी दुसरा ग्राहक उभा करणे, बनावट आधारकार्ड जोडणे, मालकी हक्क असल्याचा बनावट सातबारा किंवा पीआर कार्ड तयार करणे, ज्या प्लॉटवर ज्यांचे पजेशन नाही असेच प्लॉट हडपले जाऊ शकतात. १० ते २० वर्षापासून ज्यांनी खुले भूखंड घेऊन घेवले. मात्र त्यांचे लक्ष नाही, अशा प्लॉटधारकांना भूमाफिया ‘टार्गेट‘ करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

बॉक्स

प्लॉट असल्यास ही घ्या काळजी?

१)आपला मालकी हक्क असलेला प्लॉट भूमीअभिलेखमधून मोजून घ्या. २)खुल्या प्लॉटला संरक्षण भिंत बांधा त्याची मालकी हक्क असल्याचे प्लॉटच्या गेटजवळ फलक लावा.

३) त्याला कुणी हडपणार तर नाही ना? या करीता त्यावर काही महिन्यात जावून लक्ष ठेवा

४) मालकी हक्क असलेला सातबारा, पीआर कार्ड नेहमी अद्यावत ठेवा, सातबारा व पीआर कार्ड ऑनलाईन काढून घ्या.

कोट

प्लॉट हडपल्याच्या तक्रारी

२०१८-६

२०१९-४

२०२०- ३

बॉक्स

एकाच प्लॉटची अनेकांना विक्री

बनावट कागतपत्रे तयार करून एकच प्लॉट अनेकांना विक्री केल्याच्या काही तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाला आहे. अनेकांना तपास सुरू असून काही प्रकरणांचा पोलिसांनी तपास पूर्ण करून त्याची चार्जसिट न्यायालयात पाठविली आहे.

कोट

आपली फसवणूक होऊ नये, याकरिता प्लॉटला संरक्षण भिंत बांधा. नेहमी सातबारा व पीआरकार्ड ऑनलाईन काढून ते अपडेट ठेवा. ज्या प्लाॅटवर ज्यांची पजेशन नाही त्यांचीच सर्वाधिक फसवणुक होत असल्याचे प्रकरणे समोर येत आहेत.

- अनिल फुलझले, उपअधीक्षक भूमीअभिलेख अमरावती

कोट

सीपींचा कोट आहे.

Web Title: It became difficult to manage vacant plots, 13 plots were grabbed in the city in three years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.