उपवासाला साबुदाणा न खाल्लेलाच बरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:16 AM2021-08-12T04:16:08+5:302021-08-12T04:16:08+5:30
बॉक्स उपवासाच्या पदार्थाचे दर (प्रति किलो) भगर : १० जुलै - ११०१० ऑगस्ट - १३० साबुदाणा : १० जुलै ...
बॉक्स
उपवासाच्या पदार्थाचे दर (प्रति किलो)
भगर : १० जुलै - ११०१०
ऑगस्ट - १३०
साबुदाणा : १० जुलै - ५०
१० ऑगस्ट - ६०
नायलॉन साबुदाणा : १० जुलै ६५ - ऑगस्ट -७५
--
दर का वाढले?
भगर, साबुदाणा, शेंगदाना, खजूर यांची आवक गुजरात, तामिळनाडू व नाशिक येथून होते. मात्र, पूरस्थितीमुळे मालांची आवक होऊ शकली नाही. परिणामी पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने या वस्तूंचे दर जुलै महिन्याच्या तुलनेत वधारल्याचे भारसाकळे प्रोव्हिजनचे संचालक मनोहर भारसाकळे यांनी सांगितले.
--
उपवास आहे, मग हे पदार्थ खा।
कोट
उपवासात पचनास हलके असे पदार्थ सेवक करावे. जसे फळ, भाज्या-फळांचा रस सेवन केल्यास त्यातून प्रोटीन्स, व्हिटॅमीन मिळते. शरीराला ते पचनाला हलके असून आतील विशाक्त द्रव बाहेर काढण्यास मदतगार ठरतात. मात्र, साबुदाणा हे उपवासाच वापरू नये.
डॉ. रसिका राजनेकर,
आहारतज्ज्ञ, रिम्स हॉस्पिटल
--
साबुदाणा आरोग्याला हानिकारक
साबुदाणा तयार करण्याची पद्धत फार वेगळी आहे. झाडाचे कंद पाण्यात सडवून त्याचा लगदा तयार केल्यानंतर पायांनी तुडविले जातात. त्यानंतर रासायनिक प्रक्रियेअंती पांढरा शुभ्र स्फटिक साबुदाणा तयार होतो. त्यामुळे ते पचनास अवघड जातो. त्याऐवजी उपवासात फळांचा उपयोग करणे शरीरासाठी फायद्याचे ठरेल.