‘ते’ साडेतेरा तास

By admin | Published: February 24, 2016 12:11 AM2016-02-24T00:11:07+5:302016-02-24T00:11:07+5:30

चंद्रपुरात १४ नरबळी घेणारे ते बिबट. त्यांना सात वर्षे सांभाळण्याची तारेवरची कसरत वडाळी वनविभागाने पेलली.

'It' is an hour and a half hour | ‘ते’ साडेतेरा तास

‘ते’ साडेतेरा तास

Next

अधिकारी, कर्मचाऱ्यांची दमछाक : गोरेवाड्यात पोहोचले सुखरुप
वैभव बाबरेकर अमरावती
चंद्रपुरात १४ नरबळी घेणारे ते बिबट. त्यांना सात वर्षे सांभाळण्याची तारेवरची कसरत वडाळी वनविभागाने पेलली. मात्र, त्यांची नागपूरला रवानगी करण्यासाठी निश्चित झालेला सोमवारचा दिवस मात्र, प्रचंड थरार, मानसिक व शारिरीक चढ-उतारांचा अनुभव देणारा ठरला. शेरू व राजाला नागपूरच्या प्राणी संग्रहालयात सुखरुप पोहोचविल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सोमवारी सकाळी ९ ते रात्री १०.३० वाजतापर्यंतचे ते साडेतेरा तास वनकर्मचाऱ्यांसाठी अविस्मरणीय ठरले.
शासनाचे आदेश धडकताच उपवनसरंक्षक नीनू सोमराज यांनी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.व्ही. पडगव्हाणकर यांना बिबट्यांना गोरेवाडा प्रकल्पात पोहोचविण्याची जबाबदारी सोपविली. त्यासाठी सोमवार २२ फेब्रुवारीचा मुहूर्त ठरला होता. शनिवार, रविवारी दोन्ही बिबट्यांना उपाशी ठेवण्यात आले. ते अन्नाच्या शोधार्थ पिंजऱ्यात अडकतील, असा डाव होता. वनकर्मचाऱ्यांनी वडाळीतील बिबट्यांच्या कोठडीलगत दुसरा लहान पिंजरा ठेवून सर्वप्रथम राजाला पिंजऱ्यात घेण्याचे प्रयत्न सुरु केले. दोन्ही पिंजऱ्यांदरम्यान मोकळी जागा तर नाही ना?, याची खबरदारी घेण्यात आली.

कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
अमरावती : पिंजऱ्याबाहेर एक जिवंत कुत्रा बांधण्यात आला. पिजऱ्यांत चार किलो मटण ठेवण्यात आले. पिंजऱ्यांपासून काही अंतरावर अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवूनच होते. मात्र, दुपारपर्यंत राजा पिंजऱ्यात शिरला नाही. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर तो पिंजऱ्यात शिरला आणि कैद झाला. त्यानंतर शेरूला पिंजऱ्यात घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, शेरू बंदिस्त पिजऱ्यांतून लहान पिजऱ्यांत प्रवेश करीत नव्हता. काही वेळ परिसर निर्मनुष्य करण्यात आला. रात्र झाली तरीसुध्दा शेरू पिंजऱ्यात अडकला नाही. अखेर रात्री ८.१५ वाजता शेरूने लहान पिजऱ्यांत प्रवेश केला. तेव्हा सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर रात्री १०.१५ वाजता ते दोन्ही पिंजरे ट्रकमध्ये टाकण्याचे काम सुरु करण्यात आले. पिंजरे ट्रकमध्ये टाकण्यासाठी लोखंडी रुळ लावण्यात आले. तासभर सर्व वनकर्मचाऱ्यांनी विश्रांती घेऊन रात्री ११.१५ वाजता दोन्ही बिबट्यांना घेऊन ट्रक गोरेवाड्याकडे रवाना झाला.
थोडक्यात दुर्घटना टळली
वडाळीतून दोन्ही बिबटाना घेऊन ट्रक गोरेवाड्याकडे रवाना झाला. मध्यरात्री दरम्यान तिवसानजीक एका ट्रकने ओव्हरटेक करित वनविभागाच्या ट्रकजवळून गेले. प्रसावधानतेने ट्रक चालकांने ट्रकवर नियंत्रण मिळविले. अन्यथा दोन्ही ट्रकमध्ये अपघात होणार होता. जर ट्रकचा अपघात झाला असता तर पिजऱ्यांतील बिबट बाहेर सुध्दा निघू शकले असते. सुदैवाने दुर्घटना टळली.

तिच्या नशिबी पुन्हा विरह !

वडाळी वनपरिक्षेत्रातील बंदिस्त बिबट्यांना भेटायला अनेकदा जंगलातील मादी बिबट येत होती. पिजऱ्याभोवती घिरट्या घालून ती राजा व शेरूशी मौखिक संवादसुध्दा साधत होती. पिजऱ्यांभोवतची माती उखरून ती नर बिबट्यांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करीत होती. मात्र, दोन्ही बिबट बंदिस्त असल्यामुळे नर-मादी बिबटाचा संगम होऊ शकत नव्हता. मात्र, आता राजा व शेरू हे दोन्ही बिबट मादी बिबटपासून बरेच दूर गेले आहेत. भविष्यात ती मादी बिबट राजा व शेरूला पाहू शकणार नाही. त्यामुळे त्या मादी बिबटच्या नशिबी पुन्हा विरह असल्याचे दिसून येत आहे.

यांनी घेतले परिश्रम
दोन्ही पिजऱ्यांतील बिबटांना घेऊन ट्रक गोरेवाड्याकडे रवाना झाला. यावेळी ट्रकमध्ये वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच. व्ही. पटगव्हाणकर, रेस्क्यू पथकाचे अमोल गावनेर, मनोज ठाकूर, पशूवैद्यकीय अधिकारी, वनरक्षक करवाडे, सुर्यवंशी, सहा वनमजुर असे एकूण ३२ वनकर्मचारी होते. सोमवारचा संपूर्ण दिवस जोखीम पत्करून वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. त्यानंतरही गोरेवाडा रवाना झाल्यावर मार्गात काही ठिकाणी ट्रक थांबवून बिबट्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवण्यात आले तसेच त्यांच्यासाठी पाण्याची सोयसुध्दा वनकर्मचाऱ्यांनी केली होती.

Web Title: 'It' is an hour and a half hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.