पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी करून गंडविले

By admin | Published: February 24, 2016 12:22 AM2016-02-24T00:22:09+5:302016-02-24T00:22:09+5:30

जादूटोण्याच्या माध्यमातून हवेतून नोटांचा पाऊस पाडण्याची बतावणी करून पाच लक्ष रुपयांनी फसवणूक केली.

It was shocking to seduce the money | पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी करून गंडविले

पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी करून गंडविले

Next

पाच लाखांचा गंडा : दोन तांत्रिकांना अटक
परतवाडा : जादूटोण्याच्या माध्यमातून हवेतून नोटांचा पाऊस पाडण्याची बतावणी करून पाच लक्ष रुपयांनी फसवणूक केली. याबाबतची तक्रार अचलपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत अटक केली आहे. सय्यद गजबउद्दीन सै.जफर व सय्यद अय्युबद्दीन सै. जफर (दोघे रा. किला परिसर) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शे. कादर शे. मजीद (२९) रा. फरमानपुरा याला उपरोक्त दोन्ही आरोपींनी त्यांच्याजवळ तंत्रमंत्र विद्या असून हवेतून नोटांचा पाऊस पाडू शकतो, अशी बतावणी करून भरीस घातले. फिर्यादी पूर्णपणे जाळ्यात अडकल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी त्याच्याकडे या जादूच्या प्रयोगासाठी पाच लक्ष रूपयांची मागणी केली.
शेख कादर याने ही रक्कम आरोपींना दिली. मात्र, पैशांचा पाऊस तर सोडाच रक्कम दुप्पट होत नाही आणि मूळ रक्कमसुध्दा परत मिळत नसल्याने सोमवारी या घटनेची तक्रार त्याने अचलपूर पोलीस ठाण्यात केली. त्यावरुन पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायदा सन २०१३ नुसार गुन्हे दाखल केलेत. आरोपीला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस यापूर्वी आरोेपींनी आणखी किती जणांची फसवणूक केली, यांसह याप्रकरणाचा तपास ठाणेदार नरेंद्र ठाकरे आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: It was shocking to seduce the money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.