आयटीआयच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:15 AM2021-08-15T04:15:49+5:302021-08-15T04:15:49+5:30
अमरावती: राज्यासह जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. व्यवसाय शिक्षण व ...
अमरावती: राज्यासह जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने प्रवेशाचे वेळापत्रक नुकतेच संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. तसेच आयटीआय प्रवेश इच्छुक उमेदवारांसाठी प्रवेशाची सविस्तर माहिती पुस्तिका प्रवेश पद्धती नियमावली व प्रमाणित कार्यपद्धती संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश सत्र २०२१-२२ करिता प्रवेश हे संबंधित मंडळांनी निर्गमित केलेल्या इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेतील गुणांच्या आधारे केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून उमेदवारांना प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेण्यासाठी व प्रवेश अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा याकरीता संचालनालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेश अर्ज १५ जुलै पासून उपलब्ध करुन दिले आहेत. यावर्षी आयटीआय प्रवेश इच्छुक उमेदवारांना जिल्ह्यातील १८ शासकीय व १३ खाजगी आयटीआयमध्ये दोन्ही मिळून ६ हजार ४९६ जागा उपलब्ध असणार आहेत. आयटीआयमध्ये विविध प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असून ८० अभ्यासक्रमासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण तर ११ अभ्यासक्रमासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण अनुउत्तीर्ण उमेदवार पात्र असणार आहेत.
बॉक्स
असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे १५ जुलै ते ३१ ऑगस्ट,पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थान या विकल्प प्राधान्य गट सादर करणे १५ जुलै ते ३१ ऑगस्ट,प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे-२ सप्टेंबर, गुणवत्ता यादी बाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहीतीत बदल करणे २ ते ३ सप्टेंबर,
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे ४ सप्टेंबर
बॉक्स
फेरीनिहाय प्रवेशाची प्रक्रिया
पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व्यवसाय नियत निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना एसएमएसव्दारे कळविणे ६ सप्टेंबर,पहिल्या फेरीनुसार प्रवेश निश्चित करणे प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे ७ ते ११ सप्टेंबर,दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय संस्थानी या विकल्प व प्राधान्य सादर करणे ७ ते १२ सप्टेंबर,दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे १५ सप्टेंबर,दुसऱ्या यादीनुसार प्रवेश निश्चिती १६ ते २० सप्टेंबर,तिसऱ्या प्रवेश फेरी साठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थांनी या विकल्प व प्राधान्य सादर करणे १६ ते २१ सप्टेंबर,तिसरी गुणवत्ता यादी १४ सप्टेंबर,तिसऱ्या यादीनुसार प्रवेश निश्चिती २५ ते २८ सप्टेंबर,चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय संस्था न्याय विकल्प व प्राधान्य सादर करणे २५ ते २९ सप्टेंबर,चौथी गुणवत्ता यादी ३ ऑक्टोंबर,चौथ्या यादीनुसार प्रवेश निश्चिती ४ ते ७ आक्टोंबर