इतरांना अन् स्वत:लाही क्षमा करता येणे हा मोठा गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:29 PM2019-01-14T23:29:37+5:302019-01-14T23:29:58+5:30

क्षमा करणे हा एकच गुण मनुष्यप्राण्याला इतर सर्व प्राणिमात्रांपासून वेगळे करतो. क्षमाशीलतेच्या या अनमोल दागिन्यामुळे जसे माणसाचे वेगळेपण उठून दिसते तसेच मानवी सभ्यतेची अन् संस्कृतीची उंचीही वाढते, अशा भावना काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल्या. ‘गुड बोला, गोड बोला’ यानिमित्ताने त्या ‘लोकमत’शी संवाद साधत होत्या.

It's a great deal of forgiveness for others and for yourself | इतरांना अन् स्वत:लाही क्षमा करता येणे हा मोठा गुण

इतरांना अन् स्वत:लाही क्षमा करता येणे हा मोठा गुण

googlenewsNext
ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांनी सांगितला आनंदी जगण्याचा मंत्र

अमरावती : क्षमा करणे हा एकच गुण मनुष्यप्राण्याला इतर सर्व प्राणिमात्रांपासून वेगळे करतो. क्षमाशीलतेच्या या अनमोल दागिन्यामुळे जसे माणसाचे वेगळेपण उठून दिसते तसेच मानवी सभ्यतेची अन् संस्कृतीची उंचीही वाढते, अशा भावना काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल्या. ‘गुड बोला, गोड बोला’ यानिमित्ताने त्या ‘लोकमत’शी संवाद साधत होत्या.
शिक्षणाने वकील असलेल्या, आक्रमक नेतृत्वासाठी परिचित असलेल्या विदर्भातील एकमेव महिला विधानसभा सदस्य असलेल्या यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘one who learns to forgive, leads to a happy and peaceful life’ अर्थात ‘जी व्यक्ती क्षमा करण्याचा सद्गुण अंगी बाळगते, ती नेहतीच आनंदी आणि शांतीपूर्ण आयुष्य जगते.’ इतरांना तर क्षमा कराच; पण त्याचवेळी स्वत:लाही क्षमा करा. संवेदनशीलपणे अनुभवल्यास आपल्या संस्कृतीत, आपल्या सणावारांमध्ये मन:शांतीचे असे गमक दडल्याची अनुभूती आवर्जून येते. मकर संक्रांतीचे औचित्य साधा; क्षमा करा. शांत व्हा. आनंदी व्हा. माणुसकीचा धागा गुंफा. देश जोडण्याच्या ‘लोकमत’च्या या उपक्रमात मी सहभागी झाले, तुम्हीही व्हा, असा संदेश यशोमती यांनी दिला.

आयुष्य ही न संपणारी स्पर्धा आहे. रोज दिवस उजाडला की, धडपड, धावपळ, चढाओढ ही आलीच. समस्या अन् दु:ख हेदेखील आयुष्याचे सांगाती. तरीही आयुष्य निराशाजनक मुळीच नाही. ते ऊर्जावान आहे. आनंददायी आहे. क्षणभर थांबून क्षमाशीलतेचा विचार केला की, इतरांप्रति प्रेमभाव निर्माण होतो.

Web Title: It's a great deal of forgiveness for others and for yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.