अंगणवाडी सेविका,मदतनिस कर्मचाºयांचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 09:42 PM2017-10-05T21:42:03+5:302017-10-05T21:42:14+5:30

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एल्गार पुकारला आहे. ५ आॅक्टोबर रोजी येथील राजकमल चौकात जेलभरो आंदोलन करीत कृती समितीच्यावतीने शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधले.

Jail Bharo movement of Anganwadi worker, assistant personnel | अंगणवाडी सेविका,मदतनिस कर्मचाºयांचे जेलभरो आंदोलन

अंगणवाडी सेविका,मदतनिस कर्मचाºयांचे जेलभरो आंदोलन

Next
ठळक मुद्देशासनाचे वेधले लक्ष : मानधन वाढीवर आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एल्गार पुकारला आहे. ५ आॅक्टोबर रोजी येथील राजकमल चौकात जेलभरो आंदोलन करीत कृती समितीच्यावतीने शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधले.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी वेळोवेळी मानधनवाढीसाठी राज्य शासनाकडे सनदशीर मार्गाने मागणी नोंदविली. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जेलभरो आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाºयांना मानधनवाढ व इतर मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र दीड वर्षे लोटूनही त्या मागण्या तशाच प्रलंबीत आहेत. त्यातील एकही मागणी शासनाने निकाली काढली नाही. या संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान गुरूवारी पार पडलेल्या जेलभरो आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही, तर पुढे संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचाºयांनी दिला आहे.
मागील ११ सप्टेंबरपासून अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा संप पुकारला आहे. मात्र २३ दिवसांपासून अद्यापही शासनाने यावर निर्णय न घेतल्याने शासनाच्या या धोरणाविरोधात कृती समितीने नाराजी व्यक्त केली आहे. या आंदोलनात बी.के. जाधव, प्रमिला राव, सुमित्रा हिवराळे, रत्नमाला ब्राम्हणे, ममता सुंदरकर, मिरा कैथवास, सुनीता सोनपराते, माया पिसाळकर, प्रतिभा चिखलकर, उज्ज्वला गुळांदे, माधुरी देशमुख, माया टेभूर्णे, वंदना भोपसे, नाझिमा काजी, आयटकचे रमेश सोनुले, प्रतिभा शिंदे, ललिता वासनिक, संध्या खांडेकर, र्इंद्रायणी आठवले, अरूण नितनवरे, चंदा वानखडे, हेमलता बोरकर व अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Jail Bharo movement of Anganwadi worker, assistant personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.