जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:32+5:302021-06-16T04:16:32+5:30

शाश्वत सिंचनासाठी विविध उपक्रम राबवू, ना. बच्चू कडू यांची ग्वाही अमरावती : शेतीचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शाश्वत ...

Jal Pujan at the hands of the Minister of State for Water Resources | जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन

जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन

Next

शाश्वत सिंचनासाठी विविध उपक्रम राबवू, ना. बच्चू कडू यांची ग्वाही

अमरावती : शेतीचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शाश्वत सिंचन निर्माण होणे आवश्यक आहे. शाश्वत सिंचनासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी बेलोरा येथे दिली.

चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा, सालोरी व राजुरा अशा अनेक गावांत नदी खोलीकरणाची कामे करण्यात आली. पावसामुळे अशा ठिकाणी जलसंचय होऊ लागला आहे. जलसंपदा राज्यमंत्री कडू यांच्या हस्ते बेलोरा या ठिकाणी जलपूजन करून जलदेवतेला नमन करण्यात आले. यावेळी मंगेश देशमुख, स्वप्नील भोजने, सचिन पावडे, बबलू पावडे, मंगेश राऊत, श्याम कडू, अंकुश भोजने, प्रदीप देवले, मंगेश ठाकरे, गौरव झगडे पेडेकर, सरिता पावडे आदी उपस्थित होते.

ना. कडू म्हणाले, शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी नदी नाल्याचे खोलीकरण, सिमेंट बंधारे, ढाळीचे बांध आदींच्या माध्यमातून पाण्याची बचत केल्यास याचा फायदा शेती पिकांचे उत्पादन वाढविण्यास महत्त्वपूर्ण ठरते. सिंचनाअभावी कृषी उत्पादकतेवर प्रतिकुल परिणाम होतो. मात्र, सिंचनाचे विविध उपक्रम राबवून ठिकठिकाणी जलस्रोत निर्माण झाल्यास रबी व खरीप अशा दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. पर्यायाने पीक उत्पादनात वाढ होईल. त्यामुळे अशा अधिकाधिक उपक्रमांना चालना देण्यात येईल.

गतवर्षी जिल्ह्यात विविध ठिकाणी जलसंपदा प्रकल्पातील पाणी बचतीसंबंधी नियोजन करण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सिमेंट बंधारे, नदी, नाल्यांचे खोलीकरण उपक्रम आदी बाबींना चालना देण्यात आली आहे.

००००

Web Title: Jal Pujan at the hands of the Minister of State for Water Resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.