जिल्हा परिषदेत अंमलात येणार ‘जालना पॅटर्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:10 AM2021-06-25T04:10:45+5:302021-06-25T04:10:45+5:30
अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत १४ तालुक्यांमध्ये जवळपास ५,९३२ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांचे वेतन दरमहा ऑफलाईन ...
अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत १४ तालुक्यांमध्ये जवळपास ५,९३२ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांचे वेतन दरमहा ऑफलाईन पद्धतीने होत आहे. डोकेदुखी ठरणारी ही प्रक्रिया बदलून यापुढे शिक्षकांचे वेतन ऑनलाईन सीएमपी प्रणालीने सुरू करण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन जालना, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सीएमपी प्रणालीद्वारे अदा केले जात आहे. त्याच धर्तीवर सीएमपी प्रणाली स्थानिक जिल्हा परिषदेत अंमलात आणण्याचे दूष्ट्रीने जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांना सीएमपी प्रणाली जालना झेडपीत कशी राबविली जाते.याचे फायदे काय,ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्यात याची इंत्यभूत माहिती शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती सुरेश निमकर यांनी समावून सांगितली आहे. दरम्यान सीएमपी प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी झेडपीचे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्ता फिसके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एजाज खान आदीसह १० जणांची अभ्यास समितीने जालना जिल्हा परिषदेला भेट देऊन या ठिकाणी सीएमपी प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन कशा पद्धतीने अदा केले जाते, याची विस्तृत माहिती जाणून घेतली. सीएमपी प्रणालीसंदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी जालना सीएमपी उपक्रमाचा प्रवास व प्रणालीचे फायदे याची इंत्थंभूत माहिती अभ्यास समितीसमोर विशद केली. उप मुख्य लेखा वित्त अधिकारी पुंडगे, उपशिक्षणाधिकारी खरात, विस्तार अधिकारी सोळंके, कॅशियर सिरसाठ, भाऊसाहेब काकडे आदींनी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अन्य लाभही सीएमपी प्रणालीद्वारे दिले जातात. त्यासाठी काय उपाययोजना, कामकाज करण्याची पद्धत याबाबतही विस्तृत माहिती अभ्यास समितीने जाणून घेतली. त्यानुसार आता जालना पॅटर्न नुसार येथील जिल्हा परिषदेत प्रक्रिया राबविण्यासाठी पदाधिकारी सरसावले आहे.याकरीता लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची अध्यक्ष बबलू देशमुख हे बैठक घेणार आहे.या बैठकीनंतर यावर शिक्कोमोर्तब केले जाण्याची दाट शक्यता आहे.
कोट
सीएमपी प्रणालीची विस्तृत माहिती जाणून घेतली. या प्रणालीच्या माध्यमातून वेतनासह निवृत्तीचे लाभ, कंत्राटदराची देयके अदा केली जातात. अतिशय चांगली ही प्रक्रिया आहे. सदर प्रक्रिया राबविण्यासाठी अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात सीएमपी प्रणाली येथील झेडपीत सुरू केली जाईल.
- सुरेश निमकर,
सभापती तथा अभ्यास समिती प्रमुख