आष्ट्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 10:36 PM2018-02-27T22:36:34+5:302018-02-27T22:36:34+5:30
आॅनलाईन लोकमत
धामणगाव रेल्वे : गावाचा विकास हा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सरपंच यांच्या माध्यमातून होतो. त्यामुळे सरपंचांनी गावातील मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आ़ वीरेंद्र जगताप यांनी तालुक्यातील आष्टा येथे केले.
संत भिकाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित असलेल्या आष्टा येथे जलयुक्त शिवार अभियानातील कामांना सुरुवात झाली. अभियानात या गावाची निवड झाल्यानंतर आ़ जगताप यांच्या हस्ते खैरंग नाल्यावर सिमेंट नाला बांध, खोलीकरण व रुंदीकरण अशा २६ लाखांच्या कामाचा शुभारंभ झाला. सरपंच रिना राऊत यांच्या पुढाकाराने गावात दैनंदिन स्वच्छता, कर वसुली तसेच विविध विकासात्मक कामे युद्धस्तरावर सुरू आहेत. शासनाच्या सर्वांगीण योजना राबवून प्रत्येक ग्रामस्थाला न्याय मिळवून देणार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी जि़प़ सदस्य सुरेश निमकर, जि़प़ अध्यक्ष नितीन गोंडाणे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पोटफोडे, सभापती सचिन पाटील, प़ंस़ सदस्य संगीता निमकर, राहुल राऊत, दीपचंद भेंडे, रमेश म्हात्रे, योगेश राऊत, प्रवीण राऊत, अमोल राऊत, अग्रवाल, पंकज जाधव, संतोष भेंडे, पूजाराम ठाकरे, विनायक राऊत, किशोर राऊत, उमेश राऊत आदी उपस्थित होते़