जनसुविधा तीन कोटींच्या निधी खर्चाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:13 AM2021-03-06T04:13:11+5:302021-03-06T04:13:11+5:30
अमरावती : ग्रामीण भागात सन २०१०-२१ या आर्थिक वर्षापासून ग्रामपंचायतींना जनसुविधाकरिता ग्रामपंचायत विशेष अनुदान ही जिल्हास्तरीय योजना राबविण्यात ...
अमरावती : ग्रामीण भागात सन २०१०-२१ या आर्थिक वर्षापासून ग्रामपंचायतींना जनसुविधाकरिता ग्रामपंचायत विशेष अनुदान ही जिल्हास्तरीय योजना राबविण्यात येत आहे. यानुसार सन २०२०-२१ या वर्षात १०० टक्के ६ कोटी रुपये अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यापैकी १ कोटी ८२ हजार रुपयांच्या जनसुविधेच्या कामांना झेडपी प्रशासनाने मंजुरी प्रदान केली आहे. त्यातून जिल्ह्यात १९९ विविध प्रकारची कामे केली जाणार आहेत. यावर्षी जनसुविधा योजनेकरिता जिल्हा परिषदेला ६ कोटींचे अनुदान प्राप्त हाेणार आहे. त्यानुसार पंचायत विभागाने मागील दायित्व वजा करून ३ कोटी ८२ हजारांच्या दीडपट म्हणजेच ४ कोटी ५१ लाखांच्या मर्यादेत १३९ कामांचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान उपलब्ध तरतुदीच्या अनुषंगाने आय पास प्रणालीवर १९९ कामांकरिता जनसुविधेच्या यादीनुसार १९९ ३ कोटी ८२ हजारांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून मंजूर कामांना २ मार्च रोजी सीईओंनी मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे आता जनसुविधेच्या ग्रामीण भागातील विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर निधी १४ पंचायत समितींना पंचायत विभागाने वितरित केलेला आहे. या निधीतून स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण, सिमेंट कॉक्रिट रस्ता बांधकाम, स्मशानभूमीचे शेड बांधकाम, स्मशानभूमीला तारकुंपण करणे, पोहच रस्ता, स्मशानभूमीत बैठक व्यवस्था आदी कामे केली जाणार आहेत.
बॉक्स
पंचायत समितीनिहाय मंजूर कामे
अमरावती ३८, भातकुली ४, नांदगाव खंडेश्र्वर ४, चांदूर रेल्वे ३, धामणगाव रेल्वे १, तिवसा ८, मोर्शी ११, वरूड ८, चांदूर बाजार १२, अचलपूर ३, अंजनगाव सुर्जी ६, दर्यापूर ८, चिखलदरा ७ आणि धारणी ६ अशी एकूण १९९ कामे केली जाणार आहेत.