जावयाने सासर्याला कैचीने भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:27 AM2021-09-02T04:27:24+5:302021-09-02T04:27:24+5:30
वरूड : जावयाने सासर्याचे पोट व छातीवर कैचीने सपासप वार केल्याची घटना वरूड तालुक्यातील फत्तेपू येथे ३० ऑगस्ट रोजी ...
वरूड : जावयाने सासर्याचे पोट व छातीवर कैचीने सपासप वार केल्याची घटना वरूड तालुक्यातील फत्तेपू येथे ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली. शालिकराम गाडगे असे जखमीचे नाव असून त्यांना अत्यवस्थ स्थितीत रूग्णालयात हलविण्यात आले आहे. सासरा घटनास्थळी कसोळल्यानंतर जावयाने स्वत:च वरूङ पोलीस ठाण्यात गाठून घटनेची माहिती दिली. तथा गुन्हयाची कबुली देखील दिली. सासर्याने दारूसाठी हटकल्याने आपल्याला राग आला. त्या रागातून आपण सासर्यावर हल्ला चढविला, अशी तक्रार आरोपी जावई मिलिंद वाकपैंजन (४७, फत्तेपूर) याने नोंदविली. वरूड पोलिसांनी आरोपी मिलिंद वाकपैंजन याच्याविरूद्ध भादंविचे कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
तक्रारीनुसार, आरोपी मिलिंद हा ३० ऑगस्ट रोजी सुरळी येथे दारू पिण्यासाठी गेला. फत्तेपूरकडे परत येत असतना त्याला एक कैची सापडली. गावाजवळ पोहोचल्यानंतर त्याला सासरे शालिकराम गाडगे यांनी हटकले. दारू पिऊन आला. आता घरच्यांना त्रास देशील, असे म्हणून गाडगे यांनी जावई मिलिंद याला शिव्या दिल्या. त्या रागातून आपण सासर्यावर कैचीने सपासप वार केले. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर आपण सुरळीे गावाकडे आलो, अशी तक्रार वजा कबुली आरोपी जावयाने दिली.