जयंत नाईकनवरे अमरावती परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक
By प्रदीप भाकरे | Updated: December 14, 2022 14:42 IST2022-12-14T14:39:03+5:302022-12-14T14:42:59+5:30
गृहविभागाने पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले

जयंत नाईकनवरे अमरावती परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक
अमरावती : आयपीएस जयंत नाईकनवरे हे अमरावती परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील. गृहविभागाने १३ डिसेंबर रोजी भारतीय पोलीस सेवेतील दोन अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. यात पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या जयंत नाईकनवरे यांची अमरावती रेंजचे स्पेशल आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नवीनचंद्र रेड्डी अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त
नाईकनवरे यांच्यासाठी ते पद उन्नत करण्यात आले आहे. तर अमरावती परिक्षेत्राचे मावळते पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची बदली बृह्नमुंबईस्थित संरक्षण व सुरक्षा विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. मीणा यांनी दोन वर्षे डीआयजी म्हणून यशस्वी कार्यभार केला.