शिवतीर्थावर साकारतोय ‘जयस्तंभ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 10:48 PM2018-01-01T22:48:18+5:302018-01-01T22:48:40+5:30

रस्ता चौपदरीकरणात एका बाजूला झालेला जयस्तंभ नजीकच्याच शिवतीर्थावर स्थानांतरित होणार आहे. येत्या २६ जानेवारी रोजी नवीन जयस्तंभाचे लोकार्पण होईल.

'Jayasthaam' is celebrating on Shiv Tirtha | शिवतीर्थावर साकारतोय ‘जयस्तंभ’

शिवतीर्थावर साकारतोय ‘जयस्तंभ’

Next
ठळक मुद्देबच्चू कडूंचे प्रयत्न : समस्या मार्गी, २६ जानेवारीला लोकार्पण

आॅनलाईन लोकमत
परतवाडा : रस्ता चौपदरीकरणात एका बाजूला झालेला जयस्तंभ नजीकच्याच शिवतीर्थावर स्थानांतरित होणार आहे. येत्या २६ जानेवारी रोजी नवीन जयस्तंभाचे लोकार्पण होईल.
स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला जयस्तंभ रस्ता चौपदरीकरणात एका बाजूला झाल्याने अरुंद रस्ता व अपघाताला आमंत्रण देणारा ठरला होता. रस्ता चौपदरीकरणानंतर जयस्तंभाचे स्थानांतर करण्याचा प्रस्ताव आमदार बच्चू कडूंसह इतरांनी ठेवला होता. मात्र दोन वर्षांपूर्वीच काहींचा विरोध झाला. परिणामी अरुंद रस्ता आणि भरधाव वाहनांची गर्दी पाहता, आंतरराज्यीय महामार्गावर अपघाताची मालिकाच घडली होती. निष्पापांचा अपघाती मृत्यू आणि रक्तरंजित खेळ जयस्तंभ पाहत होता. या सर्व प्रकारामुळे दुचाकीचालक आणि पादचाºयांचा जीव धोक्यात आला होता. यामुळे अचलपूर नगरपालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थावर प्रथम स्थानी जयस्तंभ उभारण्याची जागा आरक्षित करण्यात आली होती. वाहतूककोंडीमुळे जयस्तंभचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते.

विकासकाम अंतिम टप्प्यात
परतवाडा शहरातील नवीन जयस्तंभाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने प्रगतिपथावर आहे. शिवतीर्थावर जयस्तंभ उभारण्यात आला असून, त्याला आकार देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या २३ जानेवारीपर्यंत जयस्तंभावर अंतिम हात फिरविल्यावर २६ जानेवारी रोजी आ. बच्चू कडूंसह मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
चौकावर वर्तुळ होणार
जयस्तंभाचे स्थानांतरण झाल्यावर जुन्या जयस्तंभाला हटवून तेथे रहदारी योग्य व्हावी, या दृष्टीने वर्तुळ तयार करण्यात येणार आहे. अमरावती, इंदूर, अकोला, अचलपूर आणि परतवाड्यातील गुजरीबाजारकडे जाणारी वाहतूक यामुळे सुरळीत होणार आहे.

जयस्तंभचा प्रश्न मागील दोन वर्षांपासून प्रलंबित होता. शिवतीर्थावर त्याचे २६ जानेवारी रोजी स्थानांतर व लोकार्पण केले जाणार आहे.
- आ. बच्चू कडू, अचलपूर

नवीन जयस्तंभ निर्मितीचे कार्य प्रगतीवर आहे. २३ जानेवारीपर्यंत अंतिम हात फिरवून लोकार्पणासाठी तयार व्हावा, या दृष्टीने कार्य सुरू आहे.
- प्रमोद भिलपवार, उपविभागीय अभियंता, सा.बां.

Web Title: 'Jayasthaam' is celebrating on Shiv Tirtha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.