जिजाऊ बँकेतर्फे कोविडकरिता अडीच लाखांचा धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:13 AM2021-04-24T04:13:14+5:302021-04-24T04:13:14+5:30
अमरावती : राज्यात काेराेनामुळे उद्भवलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी जिजाऊ कमर्शियल काे-ऑपरेटिव्ह बँकेकडून मुख्यमंत्री निधीस अडीच लक्ष रुपये देण्यात आले. ...
अमरावती : राज्यात काेराेनामुळे उद्भवलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी जिजाऊ कमर्शियल काे-ऑपरेटिव्ह बँकेकडून मुख्यमंत्री निधीस अडीच लक्ष रुपये देण्यात आले. हा धनादेश बँकेचे संस्थापक तथा अध्यक्ष अविनाश काेठाळे यांच्या हस्ते निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) यांना सुपूर्द करण्यात आला.
बँकेचे संचालक रामचंद्र ठाकरे, विलास राऊत, अनिल बंड, शरद बंड यावेळी उपस्थित होते. जिजाऊ बँकेचा समाजोपयाेगी विविध कामात नेहमीच सहभाग राहिला आहे. बँकेने सन २०१९-२० या वर्षात पाच लाखांची तरतूद नैसर्गिक संकटग्रस्तांना मदतीकरिता केली असून, त्यास वार्षिक आमसभेत मंजुरी देण्यात आल्याचे अध्यक्षांनी सांगितले. बँकेच्या सभासदाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास बँक १० हजार रुपये सहयाेग निधी देत असते. काेराेनामुळे सभासदाचा मृत्यू झाल्यास जिजाऊ बँक सभासदाच्या परिवारास १० हजार रुपये अधिक सहयाेग राशी आर्थिक मदत म्हणून देणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष अविनाश काेठाळे यांनी सांगितले.