जिजाऊ बँक सहकार विकास राष्ट्रीय रत्न अवार्डने गौरवांकित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:00+5:302021-09-12T04:17:00+5:30
अमरावती : जिजाऊ कमर्शियल काे-ऑपरेटिव्ह बँक लि अमरावतीचा नुकताच नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सेमीनारमध्ये सहकारी बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी ...
अमरावती : जिजाऊ कमर्शियल काे-ऑपरेटिव्ह बँक लि अमरावतीचा नुकताच नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सेमीनारमध्ये सहकारी बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी तथा नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या विकासाकरिता महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी व सहकाराच्या विकासाकरिता महत्त्वपूर्ण याेगदान दिल्याबद्दल बँकेला ‘राष्ट्रीय रत्न अवार्ड’ने गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी उत्तर प्रदेशच्या महिला बालकल्याण, टुरिझम माजी मंत्री तथा विद्यमान खासदार डॉ. रिटा बहुगुणा जाेशी यांचे शुभहस्ते अवार्ड व उल्लखनीय कामाचे प्रमाणपत्र बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव यांना देण्यात आले. हा कार्यक्रम ८ सप्टेंबरला उपसभापती सभागृह, संसद क्लब, पटेल चौक नवी दिल्ली येथे पार पडला. कार्यक्रम अध्यक्ष मेंबर बाेर्ड ऑफ डायरेक्टर आयुष मंत्रालय डॉ. दिनेश ऊपाध्याय यांच्यासह ऊत्तराखंडचे माजी मंत्री कमलसिंग नेगीव उपस्थित होते. जिजाऊ बँक ही अमरावती शहरात २० वर्षांपूर्वी सुरू झालेली बँक असून बँकेची ५०० काेटीची उलाढाल असून ३१२काेटीच्या ठेवी, १९१काेटी कर्ज वाटप केल्याचे यावेळी बँकेचे संस्थापक तथा अध्यक्ष ईंजी अविनाश काेठाळे यांनी सांगितले.