‘सखीं’सोबत उलगडला चित्रपटाचा प्रवास

By admin | Published: November 29, 2015 12:54 AM2015-11-29T00:54:07+5:302015-11-29T00:54:07+5:30

‘धनगरवाडा’ या मराठी चित्रपटातील कलाकारांसह लेखक-दिग्दर्शकांनी शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत सखी मंच’ सदस्यांशी संवाद साधला.

The journey of the film with 'Sakhi' is the film | ‘सखीं’सोबत उलगडला चित्रपटाचा प्रवास

‘सखीं’सोबत उलगडला चित्रपटाचा प्रवास

Next

अमरावती : ‘धनगरवाडा’ या मराठी चित्रपटातील कलाकारांसह लेखक-दिग्दर्शकांनी शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत सखी मंच’ सदस्यांशी संवाद साधला. स्थानिक चित्रपटगृहात ‘धनगरवाडा’चा प्रीमियर पार पडल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांच्यासह संपूर्ण टिमने मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात सखींशी संवाद साधला.
अलका कुबल यांचे पती तथा प्रसिद्ध सिनेछाया दिग्दर्शक समीर आठल्ये यांचा हा स्वतंत्र दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न. अलका कुबल या चित्रपटात कलावंत म्हणून प्रेक्षकांसमोर आल्या नसल्या तरी ‘धनगरवाडा’ ही त्यांची प्रस्तुती असल्याने त्या संपूर्ण टिमबरोबर चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी राज्यभर फिरताहेत. अमरावती शहरात काही भाग चित्रीत झाला म्हणूनच नव्हे, तर येथील सहकाऱ्यामुळेच धनगरवाडा पूर्णत्वास गेल्याची पावती त्यांनी दिली. सखी मंचच्या सदस्यांनी यावेळी अलका कुबल, चित्रपटाचे दिग्दर्शक समीर आठल्ये, कलावंत वरद चव्हाण, पल्लवी पाटील, लेखक विजय दळवी यांनी चित्रपटाचा प्रवास उलगडून दाखवला. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या धनगर समाजाचे वास्तवदर्शी चित्रण या धनगरवाडात केली असल्याचे अलका कुबल यांच्यासह लेखक-दिग्दर्शकने सांगितले. उदयोन्मुख कलाकार वरद चव्हाण, पल्लवी पाटील, पूजा पवार यांनी आपापल्या भूमिकेबाबत सखींशी संवाद साधला.
सखींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकमत सखी मंच वर्षभर सांस्कृतिक, शैक्षणिक, मनोरंजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. त्याच मालिकेला अनुसरून धनगरवाडाची संपूर्ण टीम सखींच्या भेटीला आली होती. या संवादादरम्यान ‘लोकमत’च्या ‘कालदर्शिका’ या दिनदर्शिकाचे विमोचन ‘धनगरवाडा’च्या टिमच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’चे उपप्रबंधक सुशांत दांडगे, जिल्हा प्रतिनिधी गणेश देशमुख यांचीसुद्धा उपस्थिती होती. सखी मंचच्या सदस्यांनी अलका कुबल व चित्रपटातील सर्व कलाकार, लेखकाला बोलते केले. त्यांनीही सखी सदस्यांच्या प्रश्नांना दाद दिली.
सखींनी यावेळी अलका कुबल आणि टीमसोबतच ‘सेल्फी’ घेण्याचा आनंद अनुभवला. सूत्रसंचालन सखी मंचच्या संयोजिका स्वाती बडगुजर यांनी केले. यावेळी संगीता अजमिरे, अर्चना इंगोले, छाया औगड, जरिना अली, अरुणा राऊत, करूणा कदम, पद्मा खांडे, हर्षा गोरटे आदी उपस्थित होते. विद्या सरोदे यांनी आभार प्रदर्शन केले. (प्रतिनिधी)

Web Title: The journey of the film with 'Sakhi' is the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.