महापुरुषांच्या पुतळ्यांची उभारणी केल्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 01:58 AM2019-10-16T01:58:12+5:302019-10-16T01:58:46+5:30

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बडनेरा नवी वस्तीच्या मिल चाळ येथे सोमवारी किरण पाटणकर यांचा भीमगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रवि राणा यांनी मुख्य अतिथी म्हणून व्यासपीठावरून मार्गदर्शन केले. बडनेरा मतदारसंघात गत ४० वर्षांपासून प्रश्न कायम होते. बडनेरा नगर परिषद असताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसविण्याबाबत ठराव झाला होता.

The joy of building statues of legends | महापुरुषांच्या पुतळ्यांची उभारणी केल्याचा आनंद

महापुरुषांच्या पुतळ्यांची उभारणी केल्याचा आनंद

googlenewsNext
ठळक मुद्देरवी राणा यांची माहिती : आमदारकीच्या दोन वर्षांचे दिले वेतन

अमरावती : बडनेरा शहरात गत ४० वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारणीचा प्रश्न कायम होता. मात्र, लोकआग्रहास्तव या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांच्या उभारणीसाठी दोन वर्षांचे आमदारकीचे वेतन दिले. हा अनुभव माझ्या आयुष्यात चिरकाल आनंद देणारा ठरेल, असे मनोगत रवि राणा यांनी जनसंपर्क अभियानादरम्यान व्यक्त केले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बडनेरा नवी वस्तीच्या मिल चाळ येथे सोमवारी किरण पाटणकर यांचा भीमगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रवि राणा यांनी मुख्य अतिथी म्हणून व्यासपीठावरून मार्गदर्शन केले. बडनेरा मतदारसंघात गत ४० वर्षांपासून प्रश्न कायम होते. बडनेरा नगर परिषद असताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसविण्याबाबत ठराव झाला होता. परंतु, आजतागायत महापुरुषांचे पुतळे बसविण्यात आले नव्हते. त्यामुळे येणाऱ्या पिढीला या दोन्ही महापुरुषांचे विचार, आदर्श चिरकाल स्मरणात राहावे, यासाठी समता चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे १२ फूट उंचीचे पुतळे उभारण्याचे भाग्य मला लाभले, असे ते म्हणाले. मिल चाळ, पंचशीलनगर, अशोकनगर, इंदिरानगर, झाडीफैल आदी भागांतील कुटुंबांना पीआर कार्ड मिळवून देण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर पुढाकार घेईल. विकासकामांसाठी पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन रवि राणा यांनी येथे केले.

Web Title: The joy of building statues of legends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.