पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 10:11 PM2018-05-22T22:11:05+5:302018-05-22T22:11:05+5:30

Judge the farmers who are deprived of poverty | पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या

पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या

Next
ठळक मुद्देकाँग्रेसची जिल्हा कचेरीवर धडक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१७-१८ मधील (खरीप हंगाम) अंतर्गत भातकुली, तिवसा, मोर्शी व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्यावा, अशी मागणी मंगळवारी आ. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
तिवसा मतदारसंघातील भातकुली, अमरावती व तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन २०१७-१८ मधील खरीप हंगामातील पिकांकरिता प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत विम्याची रक्कम भरलेली असतानाही ५ वर्षांचे उत्पन्न आधारित उंबरठा उत्पन्नामुळे वरील तालुक्यातील महसूल मंडळे वगळल्यामुळे विमा रक्कम मिळाली नाही. तालुकानिहाय वगळलेल्या मंडळामध्ये भातकुली तालुक्यातील : आष्टी, खोलापूर, पूर्णानगर, तिवसातील कुऱ्हा, मोझरी, वऱ्हा, तिवसा, वरखेड, अमरावती तालुक्यातील डवरगाव, माहुली, जहागीर, शिराळा, वलगाव, मोर्शीतील नेरपिंगळाई, शिरखेड, धामणगावचा समावेश आहे. तालुकानिहाय शेतकऱ्यांनी पीकनिहाय रक्कम भरूनही विमा लागू झाला नाही. आणेवारी ५० पैशाचे आत असल्याने महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना पिकाच्या विमा कंपनीकडून विम्याची योग्य रक्कम तत्काळ मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केली आहे. यावेळी झेडपी सभापती जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, शेखर औगड, दिलीप म्हस्के, अभिजित बोके, वैभव वानखडे, वीरेंद्रसिंह जाधव, प्रकाश माहोरे, दिलीप देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Judge the farmers who are deprived of poverty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.