दारूच्या नशेत चार मजली इमारतीवरून घेतली उडी  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 08:01 PM2017-09-29T20:01:07+5:302017-09-29T20:01:25+5:30

मद्यधुंद अवस्थेत वीरूगिरी करणा-या पतीने पत्नीच्या डोेळ्यांदेखतच चारमजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास नवसारी परिसरात घडली.

Jump into the drunken four-storey building | दारूच्या नशेत चार मजली इमारतीवरून घेतली उडी  

दारूच्या नशेत चार मजली इमारतीवरून घेतली उडी  

Next

अमरावती - मद्यधुंद अवस्थेत वीरूगिरी करणा-या पतीने पत्नीच्या डोेळ्यांदेखतच चारमजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास नवसारी परिसरात घडली. श्रीराम फागू मरसकोल्हे (३०,रा.नवसारी) असे मृताचे नाव आहे.
पोलीससूत्रानुसार नवसारी परिसरातील श्रीराम मरसकोल्हे मजुरीचे काम करीत होता. मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालून कुंटुंबीयांना त्याने जेरीस आणले होते. गुरूवारी दारूच्या नशेत श्रीराम घरासमोरील चार मजली नवनिर्मित इमारतीवर चढला. पत्नीने त्याला इमारतीवर चढताना हटकले. मात्र, तरी सुद्धा तो इमारतीवर चढला. इमारतीच्या वरच्या मजल्यावर चढल्यानंतर त्याने पत्नीचे लक्ष वेधून खाली उडी घेण्याची धमकी देखील दिली. पत्नीने त्याला वारंवार इमारतीवरून खाली येण्याकरिता बजावले. मात्र, डोळ्यांची पापणी लवत नाही तोच श्रीराम इमारतीवरून खाली कोसळला. यामुळे त्याची पत्नी घाबरली. रक्तबंबाळ अवस्थेतील पतीला पाहून तिने काही नागरिकांना मदतीची हाक मारली. नागरिकांनी श्रीरामला तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Jump into the drunken four-storey building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.