बाजार समितीत लिपिकाला ‘जम्पींग प्रमोशन‘
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:18+5:302021-07-15T04:11:18+5:30
अमरावती : येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत पात्र-अपात्र संचालकांच्या उपस्थितीत बुधवारी मासिक सभा पार पडली. यामध्ये एका लिपिकाला थेट सहायक ...
अमरावती : येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत पात्र-अपात्र संचालकांच्या उपस्थितीत बुधवारी मासिक सभा पार पडली. यामध्ये एका लिपिकाला थेट सहायक सचिवपदी पदोन्नती देण्याचा प्रताप अपात्र संचालकांच्या अट्टाहासाने केल्याचा प्रकार घडला.
सध्या पाच संचालक अपात्र असताना ते पूर्णत: निर्णय प्रक्रियेत ते सक्रिय सहभागी होऊन धोरणात्मक निर्णय घेत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असताना याकडे सहकार विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.
बॉक्स
नियमबाह्य पदोन्नतीचा घाट
बाजार समितीत संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतरही सभेला उपस्थित राहून तेथील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत बेकायदेशीररीत्या लिपिक पदावरून थेट सहायक सचिवपदी नियुक्ती करण्यामागे काय दडले, याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कोट
नेहमीप्रमाणे सभा पार पडली. सभेला १२ -१३ संचालक उपस्थित होते. बाजार समितीतील अंतर्गत घडामोडी यावेळी झाल्यात.
- अशोक दहीकर, सभापती, कृषिउत्पन्न बाजार समिती