शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्जासाठी ३० जूनची ‘डेडलाईन‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:10+5:302021-06-25T04:11:10+5:30

अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण फी व परीक्षा फी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन ...

June 30 Deadline for Scholarship Online Application | शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्जासाठी ३० जूनची ‘डेडलाईन‘

शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्जासाठी ३० जूनची ‘डेडलाईन‘

Next

अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण फी व परीक्षा फी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन योजना तसेच राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आदी योजना राबविण्यात येतात. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील विविध शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ३ डिसेंबर२०२० पासून कार्यान्वित झाले आहे. तसेच मागील शैक्षणिक वर्षासाठी पुन्हा अर्जाची संधी उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्य यांनी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे तसेच आपल्या महाविद्यालय स्तरावर लॉगिनवर प्रलंबित असलेले पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून तत्काळ जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे पाठविले सूचना करण्यात आले आहेत. दरम्यान शिष्यवृत्ती अर्ज ३० जून अंतिम मुदत असून त्यानंतर मुदतवाढ येणार नसल्याची समाजकल्याणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: June 30 Deadline for Scholarship Online Application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.