महापालिकेतील कनिष्ठ लिपिक, शिपायाला लाच घेताना अटक

By admin | Published: December 1, 2014 10:45 PM2014-12-01T22:45:58+5:302014-12-01T22:45:58+5:30

महापालिकेच्या झोन क्र. ५ भाजीबाजार येथील कार्यालयात कनिष्ठ लिपिकपदी कार्यरत ज्ञानेश्वर झोंबाडे, शिपाई अब्दुल राजीक याला ३० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.

The junior clerk of the municipality, the soldier was arrested for taking a bribe | महापालिकेतील कनिष्ठ लिपिक, शिपायाला लाच घेताना अटक

महापालिकेतील कनिष्ठ लिपिक, शिपायाला लाच घेताना अटक

Next

अमरावती : महापालिकेच्या झोन क्र. ५ भाजीबाजार येथील कार्यालयात कनिष्ठ लिपिकपदी कार्यरत ज्ञानेश्वर झोंबाडे, शिपाई अब्दुल राजीक याला ३० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. यात मुख्य सूत्रधार असलेला शाखा अभियंता पसार झाला असून ही कारवाई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी केली.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक मेमन कॉलनी, नूरनगर येथील रहिवासी हाफीज मो. वाजीद मो. इद्रीस यांनी महापालिकेतून ८७२ फुटाचे भूखंड मो. कलीम या दलालाच्या माध्यमातून खरेदी केले होते. मात्र याच कलीम नामक दलालाने कालांतराने हाफीज मो. वाजीद यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार महापालिकेत नोंदवली होती. या तक्रारीच्या आधारे झोन क्र. ५ चे शाखा अभियंता लक्ष्मण पावडे यांनी शिपाई अब्दुल राजीक याच्या माध्यमातून मो. वाजीद यांना नोटीस बजावली. त्यानंतर हाफीज मो. वाजीद यांनी भूखंडाची सर्व कागदपत्रे शाखा अभियंता पावडे यांच्याकडे सादर केली. ही कागदपत्रे पाहून पावडे यांनी कागदपत्रे व्यवस्थित असल्याचा शेरा दिला. कोणतेही अतिक्रमण नसल्याचे सांगितले. मात्र काही दिवसांनी दलाल कलीम हा पावडे यांना भेटला. या भुखंडप्रकरणी चिरिमिरी होऊ शकते, हे त्यांनी पटवून दिले. पुन्हा हाफीज मो. वाजीद यांना अतिक्रमणबाबत नोटीस बजावली.

Web Title: The junior clerk of the municipality, the soldier was arrested for taking a bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.