मद्यपींच्या गर्दीने स्टेशन मार्ग ठप्प

By admin | Published: April 26, 2017 12:23 AM2017-04-26T00:23:35+5:302017-04-26T00:23:35+5:30

रेल्वे स्थानक मार्गावरील दारु दुकानासमोर मद्यविक्रीचे एकमेव दुकान राहिल्यामुळे येथे मद्य खरेदी करणाऱ्यांची चिक्कार गर्दी पहावयास मिळते.

Junk station route with alcoholic crowd | मद्यपींच्या गर्दीने स्टेशन मार्ग ठप्प

मद्यपींच्या गर्दीने स्टेशन मार्ग ठप्प

Next

बडनेऱ्यात प्रवासी त्रस्त : बंदोबस्ताची मागणी
बडनेरा : रेल्वे स्थानक मार्गावरील दारु दुकानासमोर मद्यविक्रीचे एकमेव दुकान राहिल्यामुळे येथे मद्य खरेदी करणाऱ्यांची चिक्कार गर्दी पहावयास मिळते. तसेच या मार्गावर प्रचंड वर्दळ राहत असून प्रवाशांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर जयस्वाल यांचे वाईन शॉप आहे. बडनेऱ्यात व परिसरात हे एकमेव वाईन शॉप असल्यामुळे दुरदुरुन मद्यपी या ठिकाणी मद्य खरेदी करण्यासाठी येतात. सकाळी दुकान उघडण्यापूर्वीच मद्यपींची मोठी गर्दी झालेली असते. एकमेव दुकान असल्याने दिवसभर झुंबड असते. सायंकाळी हे दुकान लवकरच बंद होत असल्याने तेव्हा दुकानासमोर मोठी गर्दी वाढते. एखाद्या यात्रेत जशी गर्दी असते, अशी झुंबड या ठिकाणी असते. यामुळे मात्र रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तेथून प्रवाशांना आपली वाहने काढताना उगाचच वेळ जातो.
अनेक प्रवाशी कसाबसा मार्ग काढून रेल्वे गाड्या पकडीतआहे. तर काहींच्या रेल्वे गाड्या या मार्गावरील मद्यपींच्या गर्दीमुळे सुटत असल्याचे संतप्तपणे प्रवाशी वर्गांमध्ये बोलले जात आहे. बडनेरा शहरात व परिसरात कुठेच दारू मिळत नसल्यामुळे या एकमेव वाईन शॉपीवर मद्यपींची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे. रेल्वे पोलिसांसह शहर पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, असे प्रवासी वर्गामध्ये बोलले जात आहे. दुकान उघडताना व बंद करताना जास्त गर्दी वाढत आहे. त्या वेळेस पोलीस तैनात असावे. ज्यामुळे रेल्वे स्थानक मार्ग मोकळा राहील व प्रवाशाचीही सोय होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Junk station route with alcoholic crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.