बस्स! आता प्रतीक्षा २४ तासांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:59 PM2019-05-21T23:59:20+5:302019-05-21T23:59:56+5:30

मतदानकार्य पार पाडल्यानंतर अमरावती लोकसभेतील मतदारांना असलेली मतमोजणीची प्रतीक्षा आता उत्सुकतेच्या शिखरावर पोहोचली आहे. आता मतमोजणी आरंभ होण्यासाठी मतदारांना २४ तास धीर धरावा लागणार आहे.

Just Boss! Now wait 24 hours | बस्स! आता प्रतीक्षा २४ तासांची

बस्स! आता प्रतीक्षा २४ तासांची

googlenewsNext
ठळक मुद्देउत्सुकता शिगेला : 'फाईट टफ' आहे राजेहो..

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मतदानकार्य पार पाडल्यानंतर अमरावती लोकसभेतील मतदारांना असलेली मतमोजणीची प्रतीक्षा आता उत्सुकतेच्या शिखरावर पोहोचली आहे. आता मतमोजणी आरंभ होण्यासाठी मतदारांना २४ तास धीर धरावा लागणार आहे.
एकूण सात टप्प्यांपैकी अमरावती लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात अर्थात १८ एप्रिल रोजी मतदान पार पडले. १८ एप्रिल ते २३ मे हा मोठ्ठा कालावधी अमरावती लोकसभा क्षेत्रातील मतदारांच्या वाट्याला आला.
मतमोजणी आटोपल्यानंतर लगबगीने उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जय-पराजयाची गणिते मांडली. प्रत्येक उमेदवाराकडे त्याचे स्वत:चे कॅल्क्यूलेशन आहे. कुठे बळ मिळाले नि कुठे दगा झाला, याच्या नोंदी उमेदवारांकडे मतदानानंतर आठवडाभरातच तयार होत्या. आजारी पडायलाही उसंत मिळू नये इतकी व्यस्तता निवडणूक काळात असल्यामुळे मतदानानंतर उमेदवारांनी आपापल्या सवडीने स्वत:साठी वेळ काढला. कुणी देवदर्शनाला गेले, तर कुणी कुटुंबासोबत वेळ घालविला. इतरांच्या प्रचारात सहभागही घेतला. विश्रांती आणि पक्षीय कार्य करून झाल्यावरही मतमोजणीची तारीख जवळ येत नव्हतीच. जणू २०१९ सालातील मे महिन्यात घड्याळाचे काटे मंद झाल्याचा भसा व्हावा, अशी मनस्थिती उमेदवारांची आणि त्यांच्या निकटस्थ मंडळींची झाल्याचे अनुभवता आले. ही प्रतीक्षा अवघ्या २४ तासांत संपून जिल्ह्याला १९ वे खासदार मिळणार आहेत.
उद्या नेमाणी गोडाऊनमध्ये मतमोजणी
अमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी नेमाणी गोडाऊन येथे २३ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर, मिळालेल्या मतांची माहिती १० मिनिटांत सुविधा पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे.
१८ फेऱ्या, सहा वाजता उघडेल स्ट्राँग रूम
मतमोजणीच्या एकूण १८ फेºया होणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २० टेबल असतील. प्रत्येक टेबलासाठी एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक व एक मायक्रो आॅब्झर्व्हर असे तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २३ मे रोजी सकाळी ६ वाजता स्ट्राँग रूम उघडली जाईल. उमेदवार किंवा प्रतिनिधीद्वारे नोंदविलेल्या हरकतीची तिथेच सुनावणी होईल. यासाठी मतमोजणी प्रक्रिया थांबविली जाणार नाही.
गुरुवारी दारू दुकानांना टाळे
मतमोजणीच्या दिवशी जिल्हाभरातील दारूची दुकाने दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

उत्सुकता नाही, विजयाचा विश्वास आहे. राज्यातदेखील ३५ पेक्षा जास्त उमेदवार निवडून येणार आहेत.
- आनंदराव अडसूळ, महायुती

नऊ वर्षापासून मतदारसंघाच्या संपर्कात आहे. जनतेच्या आशीर्वादाने चमत्कार होऊन प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे.
- नवनीत राणा, महाआघाडी

सर्वच समाजघटकांनी बाळासाहेबांवर विश्वास ठेवून भरभरून मत दिले आहेत. ते मताधिक्य राहणार आहे. सर्व मतदारांचे आभार.
- गुणवंत देवपारे
वंचित बहुजन आघाडी

मतदारांना कोण पाहिजे, हे आता कळेल. ज्यांनी मतदान केले, त्या सर्वांचे आभार. जनतेचा कौल मान्य राहील.
- अरुण वानखडे
बसपा

Web Title: Just Boss! Now wait 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.